अमेरिकी कंपनीने शेकडो हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

अमेरिकी कंपनीने शेकडो हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

गेल्या काही महिन्यांपासून टेक्नोलॉजी आणि कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये होत असलेल्या नोकरकपातीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असतानाच आता एका अमेरिकी कंपनीने हिंदुस्थानातील शेकडो कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे. या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासाठी कंपनीच्या सीओओने एक व्हर्च्युअल मीटिंग बोलावली. केवळ चार मिनिटे चाललेल्या या मीटिंगमध्ये कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकत आहे, अशी माहिती दिली. कंपनीच्या या निर्णयामुळे शेकडो कर्मचाऱ्यांना धक्का बसला.

हिंदुस्थानात राहून वर्क फ्रॉम होम काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना अमेरिकेत बसून सीओओ यांनी एक झूम कॉल मीटिंग अचानक बोलावली. कर्मचाऱ्यांनी रोजच्या प्रमाणे सकाळी 9 वाजता लॉग इन केले. 11 वाजता कंपनीच्या सीओओ यांनी अर्जंट व्हर्च्युअल मीटिंगचा मेल कर्मचाऱ्यांना केला. मीटिंग सुरू होताच सर्व कर्मचाऱ्यांचे लॅपटॉपचे आणि मोबाइलचे कॅमेरे व माइक बंद करण्यात आले. कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सीओओ यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नोकर कपात करण्यात येत असल्याचे सांगितले.

या कर्मचाऱ्यांना नोकरी जाईल, असे अजिबात वाटत नव्हते. मीटिंग संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवण्यात आला. त्यात म्हटले की, तुमचा 1 ऑक्टोबर हा शेवटचा वर्किंग डे होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का बसला. या कर्मचारी कपातीचा कर्मचाऱ्यांच्या परफॉर्म्सशी संबंध नाही, तर कंपनीची कॉस्ट कटिंग आणि इंटरनल रीस्ट्रक्चरिंगचा एक भाग आहे, असे सीओओने स्पष्ट केले.

चार मिनिटांत खेळ खल्लास

कंपनीच्या सीओओ यांनी कर्मचाऱ्यांना मीटिंग घेण्यासंबंधी एक तातडीचा मेल केला. 11 वाजता मीटिंग सुरू झाली आणि 11 वाजून 4 मिनिटांनी मीटिंग संपली. या मीटिंगमध्ये एकाही कर्मचाऱ्याला बोलू दिले नाही किंवा त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. कर्मचाऱ्यांना नोकरीवरून का काढण्यात येत आहे, याची माहिती देणेही कंपनीने टाळले. 1 ऑक्टोबर हा कर्मचाऱ्यांचा शेवटचा दिवस आहे, हे कर्मचाऱ्यांना सीओओकडून कळले. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील कंपन्या मोठी कपात करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिल्ली बनलं जगातील सर्वात प्रदूषित शहर, हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली दिल्ली बनलं जगातील सर्वात प्रदूषित शहर, हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली
सर्वत्र दिवाळीच्या उत्साहाचे वातावरण असतानाच सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेली. दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर...
फिरकीच्या तालावर; तेज तर्रार गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद
जनसुराजच्या तीन उमेदवारांनी दबावाखाली आपले अर्ज घेतले मागे, प्रशांत किशोर यांचा भाजपवर आरोप
Pandharpur News – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विठ्ठल रूक्मिणीला पारंपरिक साज
Ratnagiri News – फटाक्यांच्या ऐवजी ढगांचा गडगडाट, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरच वीजपुरवठा खंडीत
नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, लोक NDA ला मतदान करणार नाहीत – पप्पू यादव
दिवाळीत पावसाची आतषबाजी! रायगड, नवी मुंबई, ठाण्यात वीज आणि ढगांच्या गडगडाटासह तुफान पाऊस