ओडिशातील कटकमध्ये हिंसाचार
देवीच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे ओडिशातील कटकमध्ये तणावाचे वातावरण आहे. विश्व हिंदू परिषदेने सोमवारी कटक बंदची हाक दिली आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाने 24 तासांसाठी शहरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे तसेच शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शहरातील दरगाहबाजार भागात शनिवारी रात्री वादाची ठिणगी पडली. देवीच्या मिरवणुकीच्या वेळी काही स्थानिक लोकांनी आवाजावर आक्षेप घेतला. त्यातून बाचाबाची सुरू झाली आणि शेवटी जोरदार हाणामारी झाली. काही लोकांनी मिरवणुकीवर दगड आणि काचेच्या बाटल्या फेकल्याची माहिती आहे. यात अनेक लोक जखमी झाले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List