शासन जेव्हा संवेदनशील आणि लोकाभिमुख नसते, तेव्हा असंतोष निर्माण होतो; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान

शासन जेव्हा संवेदनशील आणि लोकाभिमुख नसते, तेव्हा असंतोष निर्माण होतो; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाले. स्थापना दिन आणि दसऱ्याच्या निमित्ताने नागपुरात आयोजित दसरा मेळाव्याला सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले. पहलगाम हल्ला, अमेरिकेने लादलेले टॅरिफ, हिंदुस्थानच्या शेजारील राष्ट्रांमध्ये उफाळून आलेला असंतोष अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. शासन जेव्हा संवेदनशील आणि लोकाभिमुख नसते, तेव्हा असंतोष निर्माण होतो, असे विधान त्यांनी यावेळी केले.

गेल्या तीन-चार वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. भूस्खलन, सतत कोसळणारा पाऊस हे सामान्य झाले असून हिमनद्याही सुकत चालल्या आहेत. हिमालय आपल्यासाठी संरक्षक भिंतीप्रमाणे असून दक्षिण आशियासाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. जर सध्याच्या विकास पद्धतींमुळे अशा आपत्तींना प्रोत्साहन मिळत असेल तर आपल्याला आपल्या निर्णयांचा पुनर्विचार करावा लागेल. हिमालयाची आजची अवस्था धोक्याची घंटा वाजवत आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

मोहन भागवत यांनी नैसर्गिक आपत्तीसोबत शेजारील देशांमधील उलथापालथीवरही भाष्य केले. श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळसह आपल्या शेजारील देशांमध्ये आपण हे अनुभवले आहे. कधीकधी असे घडते, पण जर जनतेची दुर्दशा विचारात न घेता धोरणे आखली नाही तर असंतोष कायम राहतो. शासन जेव्हा संवेदनशील आणि लोकाभिमुख नसते, तेव्हा असंतोष निर्माण होतो. पण तो असंतोष अशा प्रकारे व्यक्त केल्याने कुणाचा फायता होत नाही. अशा प्रकारच्या आंदोलनात हिंसाचार आणि विनाश होतो, याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘grammar of anarchy’, असे म्हटले आहे, असेही भागवत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, लोकशाही मार्गाने परिवर्तन होऊ शकते, अशा हिंसक मार्गाने परिवर्तन होत नाही. क्षणिक उलथापालथ होते, मात्र स्थिती आहे तशीच राहते. जगाचा इतिहास पाहिला तर कोणत्याच क्रांतीला त्याचे उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. फ्रान्समध्ये राजाच्या विरोधात क्रांती झाली आणि त्याचा परिणाम काय झाला, तर नेपोलियन राजा बनला. राजेशाही कायम राहिली.

कम्युनिस्ट देशांमध्ये क्रांती झाली, पण सगळे देश भांडवलशाही तंत्रावर चालत आहेत. याच्याच विरोधात तिथे क्रांती झालेली. याचाच अर्थ हिंसक परिवर्तनाने उद्दिष्ट साध्य होत नाही. उलट अराजकतेच्या स्थितीत देशाबाहेरील स्वार्थी ताकदीला आपले खेळ खेळायची संधी मिळते. आपल्या शेजारच्या देशांमध्ये उलथापालथ झाली. ते आपल्यापासून लांब नाहीत. काही वर्षांपूर्वी हिंदुस्थानचाच भाग होते, ते आपलेच आहेत. त्यामुळे तिथे अस्थिरता होणे आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे, असेही भागवत म्हणाले.

दरम्यान, भागवत यांनी अमेरिकेने लादलेल्या टॅरिफवरही भाष्य केले. अमेरिकेने त्यांच्या फायद्यासाठी टॅरिफ लागू केला, मात्र त्याचा फटका संपूर्ण जगाला बसला. जग एकमेकांवर अवलंबून असून सर्व प्रकारचे संबंध आवश्यक आहेत. पण एखाद्या देशावर निर्भर असणे आपली मजबुरी बनू नये. कारण कोण, कधी बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला आत्मनिर्भर होऊन स्वावलंबी जीवन जगावे लागेल. स्वदेशीचा वापर करावा लागेल, असेही भागवत म्हणाले. तसेच पहलगाम घटनेनं आपल्याला शिकवले की कोण आपला मित्र आणि कोण शत्रू आहे, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ranji Trophy 2025-26 – मुंबईविरुद्ध 40 वर्षीय खेळाडूने ठोकलं ऐतिहासिक शतक Ranji Trophy 2025-26 – मुंबईविरुद्ध 40 वर्षीय खेळाडूने ठोकलं ऐतिहासिक शतक
Ranji Trophy 2025-26 पहिल्या दिवसापासूनच खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी ऋतुराज गायकवाड, केएस भारत, इशान किशन या...
कर्नाटकातील शाळा आणि कॉलेजमध्ये संघाच्या कार्यक्रमांवरील बंदी, राज्य सरकारचा निर्णय
पुणे बाजार समितीने पणन मंत्र्यांना दाखवला कात्रजचा घाट, मंत्र्यांचे आदेश झुगारून बाजारात पुन्हा टपरी थाटली
दुबार मतदानासाठी आधार कार्डाचा वापर, रोहित पवारांनी दाखवलं प्रात्यक्षिक
Ratnagiri News – बांधकाम कारागीराने रस्त्यात सापडलेली तीन लाख रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे केली परत, संगमेश्वर बुरंबी मार्गावरील घटना
पतंजली वेलनेसने कसे बदलले जीवन?, वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त लोकांनी आपले अनुभव सांगितले
केन विल्यम्सनचे IPL मध्ये पुनरागमन, लखनऊ सुपर जायंट्स सोबत बुद्धिचा डाव टाकणार