नवनीत राणांना भाजपचं तिकीट; उदयनराजे वेटिंगवरच

नवनीत राणांना भाजपचं तिकीट; उदयनराजे वेटिंगवरच

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपली सातवी यादी जाहीर केली या यादीत अमरावतीच्या चर्चित जागेवरून वादग्रस्त असणाऱया नवनीत राणा यांना भाजपने संधी दिली आहे, मात्र त्याचवेळी दिल्लीमध्ये साताऱयातून भाजपाची उमेदवारी मिळावी यासाठी ताटकळत बसलेल्या उदयनराजे भोसले यांना सातव्या यादीत देखील भाजपने स्थान दिलेले नाही, यावरून उदयनराजे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह स्थानिक भाजपने त्यांना कडाडून विरोध केला होता, मात्र हा विरोध डावलत भाजप श्रेष्ठाRनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केले. दुसरीकडे साताऱयातून भाजपची लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी ताटकळत दिल्लीत बसलेल्या उदयनराजे भोसले यांचा सातव्या यादीतदेखील समावेश झालेला नाही. त्यामुळे उदयनराजे यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता असून उदयनराजेंची उमेदवारी जाहीर होणार तरी कधी? असा प्रश्न समर्थकांमधून विचारला जात आहे. भाजपने आतापर्यंत 407 उमेदवारांची घोषणा केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

'सुप्रियाताई चतुर्थीला अन् अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात';  मिटकरींचा हल्लाबोल 'सुप्रियाताई चतुर्थीला अन् अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात'; मिटकरींचा हल्लाबोल
शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आघाडी घेतली आहे. 2018 साली मी आणि खासदार डॉ. अमोल...
चित्रपट मिळत नसताना ही कसा चालतो गोविंदाचा घर खर्च, पाहा कुठून करतो करोडोंची कमाई
दहापेक्षा अधिक अकाउंट, धर्माकडे झुकाव, ‘तारक मेहताच्या सोढी’चे बेपत्ता होण्याचे रहस्य अखेर..
पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने, डॉ. मुणगेकरांनी केली टीका
तीन टप्प्यांचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणारं; शरद पवार यांचं मोठं भाकित
संदेशखळीतील एका महिलेकडून बलात्काराची तक्रार मागे, भाजप नेत्यांनी खोटी तक्रार केल्याचा आरोप
दोघांच्या वयात 26 वर्षाचे अंतर, तरीही ‘ही’ एक गोष्ट आहे एकसारखी, मिलिंद सोमन आणि अंकिता..