दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप, 30 हजार मूर्तींचे विसर्जन; पालिकेकडून 300 कृत्रिम तलावांची सुविधा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप, 30 हजार मूर्तींचे विसर्जन; पालिकेकडून 300 कृत्रिम तलावांची सुविधा

मुंबईमध्ये गुरुवार दुपारपासून दीड दिवसांसाठी स्थापन केलेल्या सुमारे 30 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये 29 हजार 614 घरगुती मूर्तींचा समावेश आहे. पालिकेकडून विसर्जनासाठी तब्बल 300 कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असून भाविकांनी विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांनाच प्राधान्य दिले. पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने दीड दिवसांच्या बाप्पाचे निर्विघ्नपणे विसर्जन पार पडले.

मुंबईसह राज्यात सर्वांच्या लाडक्या बाप्पाची काल बुधवारी मनोभावे स्थापन करण्यात आली. दीड दिवसांसाठी स्थापना करण्यात आलेल्या बाप्पाला आवडत्या मोदकासह गोडधोड नेवैद्य दाखवत विधिवत पूजा करण्यात आली. दिवसरात्र भजन, कीर्तन आणि आरती करून बाप्पाची सेवा करण्यात आली. यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात आला.  ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत बाप्पाला निरोप देण्यात आला.

पालिकेकडून नियोजनबद्ध व्यवस्था

  • महापालिकेने, विसर्जन स्थळी निर्माल्य कलश, समुद्र, खाडीच्या ठिकाणी विसर्जन करताना कोणीही समुद्रात बुडू नये यासाठी जीवरक्षक, मोटार बोट, नियंत्रण कक्ष, मोबाईल टॉयलेट, निरीक्षण मनोरे, वैद्यकीय मदत, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका, आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
  • उंच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. विसर्जन स्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आजच्या विसर्जनप्रसंगी कोणतीही दुर्घटना घडली नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज रत्नागिरीत तिळाच्या शेतीचे क्षेत्र घट, स्थानिक पातळीवर संवर्धनाची नितांत गरज
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पूर्वी भरभराटीत असलेली तिळाची शेती आता दुर्मिळ होत चालली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या आणि अन्नतेल म्हणून...
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत सापडले हजारो अपात्र लाभार्थी, सरकारला 100 कोटींहून अधिक नुकसान
आज खरी भाजप सत्तेत नाहिये, भारत – पाकिस्तान सामन्यावरून आदित्य ठाकरे यांचा टोला
संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंच्याच मागे जाणार! नाशिकमधील विराट मोर्चातून संजय राऊत यांची गर्जना
किचनमधील या ५ गोष्टी कधीही चेहऱ्यावर लावू नका, त्वचेचे होईल नुकसान
60 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपावर शिल्पा शेट्टीच्या पतीने सोडले मौन
कसा विश्वास ठेवायचा यांच्या बोलण्यावर? मोदी-फडणवीस यांचे व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया यांचा घणाघात