राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानीसाठी अहमदाबादची दावेदारी, केंद्रीय मंत्रिमंडळाने यजमानपदाच्या बोली प्रस्तावाला दिली मंजुरी

राष्ट्रकुल स्पर्धेच्या यजमानीसाठी अहमदाबादची दावेदारी, केंद्रीय मंत्रिमंडळाने यजमानपदाच्या बोली प्रस्तावाला दिली मंजुरी

हिंदुस्थानने २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी अधिकृतपणे दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने या स्पर्धेच्या यजमानपदाच्या बोली प्रस्तावाला मंजुरी दिली. यापूर्वी १४ ऑगस्टला हिंदुस्थान ऑ लिम्पिक संघटनेने (आयओए) यास मान्यता दिली होती. आता हिंदुस्थानला ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम बिडिंग प्रस्ताव सादर करावा लागेल. २०३० च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद हिंदुस्थानला मिळणार की नाही याबाबतचा अंतिम निर्णय नोव्हेंबरपर्यंत होईल.

कॅनडाने शर्यतीतून माघार घेतल्याने हिंदुस्थानच्या दावेदारीची शक्यता अधिक बळकट झाली आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रकुल स्पर्धेचे संचालक डॅरेन हॉल यांच्या नेतृत्वाखालील टीमने अहमदाबादमधील प्रस्तावित क्रीडा मैदानांची पाहणी केली होती. यावेळी गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांशीही बैठक झाली.

ऑलिम्पिकसाठीही हिंदुस्थानचा दावा

हिंदुस्थान २०३६ च्या ऑलिम्पिकसाठीही तयारी करत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हिंदुस्थानने औपचारिक दावेदारी सादर केली होती. २०२८ चे ऑ लिम्पिक लॉस एंजेलिसमध्ये, तर २०३२ चे ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे होणार आहेत.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बिडिंगचे ५ टप्पे

यजमान होऊ इच्छिणाऱ्या शहराला (देशाला) राष्ट्रकुल क्रीडा संस्थेकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर त्या देशाची राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती प्रस्तावास मंजुरी देते. देशाच्या सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर अंतिम बिडिंग सादर केले जाते. राष्ट्रकुल क्रीडाचे अधिकारी यजमान शहर व क्रीडा मैदानांची पाहणी करतात. सर्व दावेदारांची तपासणी झाल्यावर राष्ट्रकुल क्रीडाच्या सर्वसाधारण बैठकीत अंतिम यजमान जाहीर करते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News – क्षुल्लक वादातून बारबाहेरच टोळक्याकडून तरुणाची हत्या, मालाडमध्ये खळबळ Mumbai News – क्षुल्लक वादातून बारबाहेरच टोळक्याकडून तरुणाची हत्या, मालाडमध्ये खळबळ
हॉटेल व्यावसायिकाशी झालेल्या क्षुल्लक कारणातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाची हत्या केल्याची घटना मालाडमध्ये घडली. कल्पेश भानुशाली असे हत्या झालेल्या...
अमेरिकेतही क्रांतीची ठिणगी! डोनाल्ड ट्रम्प यांचा राइट हँड चार्ली किर्क यांची गोळ्या घालून हत्या
तरुणीने विनवण्या करुनही प्रियकर ऐकला नाही, धावत्या ट्रेनमधील तरुणाचे कृत्य व्हायरल
Sindhudurg Crime News – निर्दयी मुलाचा जन्मदात्या आईवर कोयत्याने हल्ला; मातेचा जागीच मृत्यू, कणकवली तालुका हादरला
हुकूमशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! संजय सिंह यांच्या नजरकैदेवरून संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
Video – ‘आप’चे खासदार संजय सिंह नजरकैदेत, राजकीय वर्तुळात खळबळ
Video- सोलापुरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार