Sachin Tendulkar on Arjun’s Engagement – अर्जुनच्या साखरपुड्याबाबत सचिननं सोडलं मौन, चाहत्याच्या प्रश्नावर म्हणाला…

Sachin Tendulkar on Arjun’s Engagement – अर्जुनच्या साखरपुड्याबाबत सचिननं सोडलं मौन, चाहत्याच्या प्रश्नावर म्हणाला…

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्याशी अर्जुनचे लग्न जमल्याचे समोर आले होते. मात्र याबाबत तेंडुलकर किंवा घई कुटुंबाकडून अधिकृत माहिती समोर आली नव्हती. त्यामुळे अर्जुनचा साखरपुडा झाला की नाही? असा सवाल चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. आता सचिन तेंडुलकर यानेच याबाबत भाष्य केले असून अर्जुनचा साखरपुडा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा मुंबईतील कौटुंबिक कार्यक्रमात साखरपुडा पार पडल्याचे समोर आले होते. या सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील खास व्यक्ती आणि काही मोजके मित्रच उपस्थित होते. विशेष म्हणजे साखरपुड्याचा हा सोहळा अत्यंत गुप्तपणे पार पडला होता आणि याचे फोटो, व्हिडीओही समोर आले नव्हते. त्यामुळे अर्जुनचा साखरपुडा झाला की नाही, हे स्पष्ट होत नव्हते. मात्र आता सचिनने याला दुजोरा दिला आहे. reddit वरील ‘आस्क मी एनीथिंग’ कार्यक्रमावेळी सचिनने याची अधिकृत घोषणाच केली.

reddit वरील कार्यक्रमामध्ये काही निवडक चाहत्यांना थेट सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. यावेळी एका चाहत्याने अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झालाय का? असा प्रश्न सचिनला विचारला. यावर सचिनने उत्तर दिले की, “हो, अर्जुनचा साखरपुडा पार पडला असून त्याच्या आयुष्यातील नवीन टप्प्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत.” त्यामुळे अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा झाल्याचे स्पष्ट झाले असून आता चाहत्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, अर्जुन (वय – 25) आणि सानिया (वय – 26) यांचा 13 ऑगस्ट रोजी साखरपुडा झाला. सानिया ही अर्जुनची बालपणीची मैत्री असून त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे. प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची ती नात असून तिने मुंबईतील कॅथेड्रन अँड जॉन कॉनन स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये तिने पदवी मिळवली. त्यानंतर ती मुंबईत परतली आणि प्रिमियम पाळीव प्राण्यांचे सलून, स्पा आणि स्टोअर मिस्टर पॉजची स्थापना केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवदाम्पत्याने वादातून संपवले जीवन ! संगमनेरमध्ये खळबळ नवदाम्पत्याने वादातून संपवले जीवन ! संगमनेरमध्ये खळबळ
पठार भागातील सख्ख्या चुलत बहिणींच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात एका नवदाम्पत्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने संगमनेरमध्ये खळबळ...
कोल्हापूर जिल्ह्यात ‘कोल्हापूर गॅझेटियर’ त्वरित लागू करा; मराठा महासंघाची मागणी
सावधान! अशी परिस्थिती कुठल्याही देशात होऊ शकते; नेपाळमधील अराजकतेवरून संजय राऊत यांचा इशारा
Sindhudurg News – भूमी अभिलेख कार्यालयाने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा…; वैभव नाईक यांचा आंदोलनाचा इशारा
महादेवपुरा मतदारसंघाप्रमाणे चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी, एक महिन्यात कारवाई करा अन्यथा न्यायालयात दाद मागू – अतुल लोंढे
जनसुरक्षा कायद्याविरोधात महाराष्ट्रात उद्या राज्यव्यापी आंदोलन, शिवसेनाही होणार सहभागी
लडाखमधील सियाचीन ग्लेशियरमध्ये हिमस्खलन, तीन जवानांना वीरमरण