गांजाची तस्करी पकडली
पांढऱ्या रंगाच्या वेगनआर कारमधून होत असलेली गांजाची तस्करी वडाळा टीटी पोलिसांनी रंगेहाथ पकडली. पोलिसांनी दोघा तस्करांना पकडून तब्बल 51 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला.
वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना त्यांना एक वेगनआर कार संशयास्पदरीत्या जाताना दिसली. त्यामुळे पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा केला. परंतु चालकाने कार थांबविण्याऐवजी पुढे पळवली. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून कारला एकेठिकाणी थांबवले. त्यानंतर कारमधील अबुबकर शान आणि शहबाज खान यांच्याकडे विचारणा करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे कारची झडती घेतली असता तब्बल 51 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा मिळून आला. पोलिसांनी दोघा गांजा तस्करांना बेडय़ा ठोकल्या असून त्यांनी हा गांजा कोठून आणला व तो गांजा ते कोणाला विकणार होते याचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List