15 हजार कोटी रुपये खर्च करूनही मुंबईची झाली तुंबई, अतिरिक्त निधी देऊनही पालिका अधिकाऱ्यांचे पावसाकडे बोट

15 हजार कोटी रुपये खर्च करूनही मुंबईची झाली तुंबई, अतिरिक्त निधी देऊनही पालिका अधिकाऱ्यांचे पावसाकडे बोट

पावसाळ्यात मुंबईत पाणी साचू नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने हजारो कोटी रुपये खर्च केले होते. तरी मंगळवारी मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले आणि शहरातले जनजीवन विस्कळीत झाले होते. 2025-26 च्या अर्थसंकल्पात, पालिकेने शहरी पूरनियंत्रण व जलसंपदा व्यवस्थापनासाठी तब्बल 15,048 कोटी रुपये मंजूर केले केले होते

इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. महापालिकेने पावसाचे पाण्याचा निचरा होण्यासाठी 2,200 कोटी रुपयांचीी तरतूद केली होती. पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरात साचलेल्या पाण्यासाठी आणि व पूरस्थितीसाठी मुसळधार पावसाला जबाबदार धरले. पालिकेच्या स्वयंचलित हवामान प्रणाली मध्ये नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईतील अनेक भागांत पावसाने 300 मिमीचा टप्पा ओलांडला होता.

पालिकेच्या आकडेवारीनुसार, मुसळधार पावसामुळे खालील भागात सर्वाधिक फटका बसला. चिंचोली (मालाड) येथे 369 मिमी, कांदिवली येथे 337 मिमी, दिंडोशी येथे 305 मिमी, दादर व मगताने येथे प्रत्येकी 300 मिमी, विक्रोळी येथे 293 मिमी, पोवई येथे 290 मिमी, मुलुंड येथे 288 मिमी व फॉसबरी (आझाद मैदान – कोलाबा) येथे 265 मिमी पाऊस झाला.

मंगळवारी पहाटे पावसाचा जोर वाढताच हे सर्व भाग पाण्याखाली गेले होते आणि वाहतुकीसह दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. पालिकेने 130 कोटी रुपये खर्च करून हिंदमाता भागात पंपिंग स्टेशन उभारले होते पण ते ही निष्फळ ठरले. कारण मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तेथील संपूर्ण चौक पाण्याखाली गेला. गेल्या चार दिवसांत मुंबईतून 1,600 कोटी लिटरहून अधिक पाणी बाहेर काढले गेले, जे तुलसी तलावाच्या 800 कोटी लिटर क्षमतेच्या दुप्पट आहे अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.16 ते 19 ऑगस्टदरम्यान मुंबईतील सर्व सहा पंपिंग स्टेशन तसेच 540 पोर्टेबल डीवॉटरिंग पंप सतत कार्यरत होते आणि या कालावधीत एकूण 1,645 कोटी लिटर पाणी या पंपांमार्फत मुंबईतून बाहेर काढले गेले,असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पंप अखंडितपणे कार्यरत असूनही, काही ठिकाणी पाणी साचत होते, कारण काही तासांत 100 मिमी पावसाचा सामना करण्याची क्षमता कोणत्याही शहराकडे नसते. सोमवारी पाच तासांत 200 मिमी पाऊस झाला होता आणि मंगळवारी हा आकडा 300 मिमीपर्यंत गेला. याशिवाय भरतीची वेळ असल्यामुळे नाले सतत पाण्याखाली राहिले, ज्यामुळे दीर्घकाळ पाणी बाहेर जाऊ शकले नाही आणि पाणी साचले,असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

याशिवाय, पालिकेच्या आकडेवारीनुसार सहा पंपिंग स्टेशनपैकी सर्वाधिक पाणी इरला पंपिंग स्टेशनमधून 3,768 दशलक्ष लिटर बाहेर काढण्यात आले. त्यानंतर क्लीव्हलंड बुंदरमधून 2,906 दशलक्ष लिटर व गझदरबांध येथून 2,870 दशलक्ष लिटर पाणी बाहेर टाकण्यात आले. याशिवाय, 540 डीवॉटरिंग पंपांनी मंगळवारी केवळ सहा तासांत 182.5 कोटी लिटर पाणी बाहेर काढले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय करावं? जाणून घ्या तज्ञांचे मत…. पावसाळ्यात डेंग्यूपासून बचावासाठी काय करावं? जाणून घ्या तज्ञांचे मत….
पावसाळा सुरू होताच अनेक आजारांना सोबत घेऊन येतो. पावसाळ्यात अनेकांना संसर्गाच्या समस्या होतात. पावसाळ्यात तुमची रोगप्रतीकारकशक्ती वाढवणे गरजेचे असते. पावसाळ्यात...
न्या. चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाची घेतली शपथ
नगरपालिका निवडणुकांसाठी EVM ऐवजी मतपत्रिकेचा वापर करा, कर्नाटक मंत्रिमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
चुकीच्या पद्धतीने GST लागू केला, आता माफी मागण्याऐवजी गर्विष्ठपणे भेट दिल्याची जाहिरात करताय; आदित्य ठाकरे यांचा टोला
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते आशिष वारंग यांचं निधन
SA Vs ENG – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनी इंग्लंडचं मैदान मारलं, फक्त 5 धावांनी केलं चितपट
हिंदुस्थान-रशियाला चीनच्या हाती गमावलं, टॅरिफ वॉर दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य