भायखळ्यातील सचिन कुर्मी हत्येचा एसआयटीकडून तपास, मोक्काअंतर्गत कारवाई करणार

भायखळ्यातील सचिन कुर्मी हत्येचा एसआयटीकडून तपास, मोक्काअंतर्गत कारवाई करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे भायखळा तालुका अध्यक्षांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येचा तपास करण्यासाठी  एसआयटी स्थापन केली जाणार असून आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिले.

भायखळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्येच्या प्रकरणावर विधान परिषदेत सदस्य पंकज भुजबळ यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. राजकीय व्यक्तीची हत्या करून गुन्हेगार परिसरात दहशत पसरवत आहेत तसेच कुर्मी कुटुंबीयांना धमकावत आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. दरम्यान, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर मोक्का लावण्याची मागणी केली. गृहराज्यमंत्री कदम यांनी सभागृहाला सांगितले की, आतापर्यंत 6 आरोपींना या प्रकरणात अटक केली आहे. आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी केली जाईल तसेच कुर्मी यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात येईल. मुलाला धमकवण्यात येत असल्यास तातडीने कारवाई करू, असे आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिले.

यशवंत जाधव यांच्यासह

अनेकांची नावे 

पोलिसांनी या प्रकरणात राजकीय लोकांना मदत केली. राजकीय व्यक्तींना वाचवण्यासाठी मंत्र्यांनी पह्न केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. संबंधित कुटुंबीयांनी यशवंत जाधव यांच्यासह अनेकांची नावे घेतली. त्या राजकीय व्यक्तींना अटक करा, कुर्मी कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी दानवे यांनी केली. याप्रकरणी नावे घेतलेल्या प्रत्येकाची चौकशी करून त्यात दोषी असणाऱयांवर कारवाई करू, असे आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिले.

राजकीय हस्तक्षेप सहन करणार नाही

सीडीआर रिपोर्ट तसेच सर्व तांत्रिक पुरावे लवकरच तपासले जातील. कोणतीही माहिती दडपली जाणार नाही. कोणत्याही स्तरावर हस्तक्षेप सहन केला जाणार नाही तसेच प्रकरणाच्या गंभीरतेची दखल घेऊन एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा तपास संपूर्ण पारदर्शक पद्धतीने केला जाईल. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कदम यांनी दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त
नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, नागरीकरण आणि कायदा-सुव्यवस्था या आव्हानांचा विचार करून राज्य सरकारने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना करण्याच्या...
वृद्ध मातापित्यांना सांभाळण्यासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 50 हजार रुपये, पीएफ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
इंटेल 24 हजार कर्मचाऱ्यांना काढणार, खर्च कपातीसाठी कंपनीचा निर्णय
अश्लील कंटेट भोवले; 25 अ‍ॅप्सवर बंदी
सीईओ सुंदर पिचाई अब्जाधीशांच्या यादीत
ऑगस्ट महिन्यात 16 दिवस बँका बंद राहणार