मुलीवरील अत्याचारप्रकरणी दोन आरोपींना अटक; दौंडमधील स्वामी चिंचोलीजवळ वारकऱ्यांवर झाला होता हल्ला
पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवत लुटमार करण्यासह एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणातील दोघा आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. 30 जून रोजी दौंड भागातील स्वामी चिंचोली येथे ही घटना घडली होती.
आमिर पठाण (30) आणि विकास सातपुते (28) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी टेम्पोतील महिलांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून दागिने हिसकावून घेतले. गोंधळाचा फायदा घेत एकाने मुलीवर अत्याचार केला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दहा पथके तयार केली होती. आरोपींची स्केचेस तयार करून संशयित गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. यानंतर तांत्रिक तपासावरून दोघांना अटक केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List