‘औकात नहीं है…’, या पाकिस्तानी स्टार्संना विदेशातून सोशल मीडियावर ट्रोल; हानिया ते माहिरा सर्वच रडारवर

‘औकात नहीं है…’, या पाकिस्तानी स्टार्संना विदेशातून सोशल मीडियावर ट्रोल; हानिया ते माहिरा सर्वच रडारवर

7 मे 2025 रोजी झालेल्या पहागाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांचे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेत. तर आज 8 मे रोजी सकाळपासूनच भारतीने पाकिस्तानमधील 13 शहरांवर हल्ले केले आहेत.

दरम्यान ऑपरेशन सिंदूर वर पाकिस्तानी कलाकारांनी पुन्हा एकदा तोंडातून विष ओकले आहे. त्यांच्या या प्रतिक्रिया त्यांना खूप महागात पडत आहेत. भारतात या स्टार्सच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर बंदी असली तरी, परदेशात असलेले भारतीय त्यांची खिल्ली उडवत आहेत. त्यांच्या या प्रतिक्रियांवर त्यांना ट्रोल करत आहेत.एवढंच नाही तर त्यांच्यावर राग काढत आहेत.

ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तानी कलाकार ट्रोल

ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तानी कलाकारांना सोशल मीडियावर खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केल्यानंतर ट्रोलिंग सुरू झाले. या घटनेनंतर, माहिरा खान, हानिया आमिर आणि फवाद खान सारख्या पाकिस्तानी स्टार्सनी भारतीय हवाई हल्ल्यांवर टीका केली. या विधानांनंतर, भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यांना ‘दहशतवादी समर्थक’ आणि ‘भारतविरोधी’ म्हटले गेले.

ट्विटरवर #BoycottPakActors आणि #AntiIndiaCelebs सारखे हॅशटॅग

भारतीय युजर्संनी या कलाकारांची जुनी विधाने आणि मुलाखतीच्या क्लिप्स शेअर करून त्यांना लक्ष्य केले. काही वापरकर्त्यांनी त्यांना बॉलिवूडपासून दूर ठेवण्याची मागणी केली आहे. ट्विटरवर #BoycottPakActors आणि #AntiIndiaCelebs सारखे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहेत. या संपूर्ण घटनेने हे दाखवून दिले की देशात आणि परदेशात राहणारे भारतीय कसे एकजूट आहेत आणि शत्रूच्या प्रत्येक वाराला योग्य उत्तर देण्यास भारत सक्षम आहेत. तसेच युजर्स असेही म्हणत आहेत की, “या स्टार्सचा कडक निषेध व्हायला हवा,कारण त्यांनी एकतर भारतातील हल्ल्याचा निषेध केला नाही किंवा त्यांनी भित्रेपणा दाखवला.”

pakistan artists troll

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी कलाकारांवर राग काढला 

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर आणि माहिरा खानसह अभिनेता फवाद खानवर टीका होत आहे. सोशल मीडियावर चुकीचे बोलण्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर हानिया आमिर, माहिरा खान आणि फवाद खान यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी भारतीय हवाई हल्ल्यांना चुकीचे म्हटले. पोस्ट व्हायरल होताच या सर्वांना टीका सहन करावी लागतेय.

युजर्सच्या कमेंट्स  

त्यांच्या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर करत एका युजरने लिहिले की, ‘तुमचे स्टेटस फक्त शिवीगाळ करण्यासाठी आहे.’ एका व्यक्तीने लिहिले, ‘ज्यांचे मीठ तुम्ही खाता त्यांचा तुम्ही विश्वासघात करता.’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘तुम्हाला भारताबद्दल जराही दया आली नाही आणि तुम्ही तुमच्या देशाचे नावही घेऊ शकत नव्हता आणि आता तुम्ही विष ओकायला आला आहात.’ एका व्यक्तीने लिहिले, ‘औकातीत राहा.’ तर एका व्यक्तीने लिहिले, ‘तुमच्यात आमचं काहीही नुकसान करण्याची हिंमत नाही.’ अशापद्धतीने पाकिस्तानी स्टार्स सोशल मीडियाच्या रडारवर आहे.

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सचिनच्या लेकीला वाटते ‘या’ गोष्टीची सर्वात जास्त भीती; साराचं उत्तर जाणून आश्चर्य वाटेल सचिनच्या लेकीला वाटते ‘या’ गोष्टीची सर्वात जास्त भीती; साराचं उत्तर जाणून आश्चर्य वाटेल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर तिचे व्हॅकेशन आणि कामाशी संबंधित अपडेट्स शेअर...
अंगाला लागलेल्या हळदीसह नवरदेव जवान सीमेवर हजर, नवरी म्हणाली ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझे कुंकू पाठवतेय
Operation Sindoor- लढाऊ गणवेशात अवतरल्या हिंदुस्थानच्या रणरागिणी!
रत्नागिरी – पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला चोपले
Operation Sindoor- जय हिंद! हिंदुस्थानी सैन्याची ही आहे बलाढ्य शक्ती, पाकिस्तानला आता पळता भुई थोडी
Operation Sindoor – आमच्या सहनशिलतेचा कोणीही गैरफायदा घेऊ नये, अन्यथा सणसणीत प्रत्युत्तर मिळेल; राजनाथ सिंहांचा पाकला खणखणीत इशारा
Operation Sindoor ‘आम्ही गुन्हेगार आहोत, अल्लाह आमची हिफाजत कर’ पाकिस्तानी खासदार संसदेत ढसाढसा रडला