हल्ल्याच्या तीन दिवस आधी मोदींकडे होते इनपुट्स! पहलगामबाबत खरगे यांचा खळबळजनक दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे इनपुट्स गुप्तचर यंत्रणांकडून मिळाले होते. त्यानंतर मोदींनी आपला नियोजित कश्मीर दौरा रद्द केला, असा खळबळजनक दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
सर्वपक्षीय बैठकीत सुरक्षेत कसूर झाल्याची कबुली देण्यात आली. सरकारकडून पुढील काळात त्यावर उपाय योजले जातील. परंतु, जर हल्ला होणार हे आधीपासून माहीत होते तर त्यावर काहीच का केले नाही? पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावले का उचलली नाहीत, असा सवाल खरगे यांनी केला.
- पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कश्मीर दौरा करणे धोक्याचे ठरेल असे अहवालात नमूद करण्यात आले होते, मग पंतप्रधानांनी याबाबत स्थानिक पोलीस आणि सीमा सुरक्षा दलांना कश्मीरमधील लोकांच्या सुरक्षेबाबत अलर्ट का केले नाही, असा सवालही खरगे यांनी केला आहे. मोदींनी कश्मीर दौरा रद्द केला; परंतु पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अधिक लष्कर, सुरक्षा दल जवानांची अधिक कुमक पाठवली नाही याकडे खरगे यांनी लक्ष वेधले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List