ब्रश की दातून? दातांच्या आरोग्यासाठी नेमकं काय जास्त फायदेशीर? जाणून घ्या आयुर्वेदाचं गुपित!
दातांची निगा राखण्यासाठी ब्रश आणि पेस्ट यांचा वापर आपल्याला आता अगदी सवयीचा झाला आहे. पण पूर्वीच्या काळात दात घासण्यासाठी टूथब्रश नव्हताच! आपल्या आजोबा-आजींच्या काळात कडुलिंब, बाभूळ यांसारख्या झाडांच्या काड्या वापरल्या जायच्या. आजही अनेकजण दातून वापरण्याला पसंती देतात. पण खरं तर, आयुर्वेदात दातूनाला एक वेगळंच स्थान दिलं आहे.
आयुर्वेदामधील दातूनचं महत्त्व
आयुर्वेदाचार्य महर्षी वाग्भट यांनी त्यांच्या ‘अष्टांग हृदयम्’ या ग्रंथात दातूनाचे फायदे मोठ्या बारकाईने सांगितले आहेत. दातून केवळ दात स्वच्छ करत नाही, तर तोंडातल्या दुर्गंधीपासून सुटका करते, चव सुधारते आणि शरीराच्या एकंदर आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते.
‘या’ १२ झाडांच्या काड्या दातूनसाठी उत्तम!
आयुर्वेदानुसार दातून कडू किंवा तुरट चव असलेलं असावं. कडुलिंब हे यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. पण त्यासोबतच वाग्भट यांनी रुई, बाभूळ, अर्जुन, आंबा, पेरू, जांभूळ, मोह, करंज, वड, आघाडा, बोर आणि बांबू या १२ झाडांच्या काड्यांचा उल्लेख केला आहे.
प्रत्येक दातूनाचे फायदे वेगळेच!
कडुलिंब : दातांवरची कीड, प्लाक, दुर्गंधी यावर उपयुक्त. तोंडात अँटीबॅक्टेरियल संरक्षण.
बाभूळ : हिरड्या मजबूत करतो, तोंडाच्या फोडांवर आराम मिळतो.
अर्जुन : हृदयासाठी फायदेशीर मानला जातो, दात घासल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होतो.
वड : डोळ्यांचे आरोग्य आणि दातांच्या मजबुतीसाठी उपयुक्त.
आंबा, पेरू, जांभूळ : पचन सुधारते, घसा स्वच्छ राहतो.
दातून कसं करावं? जाणून घ्या योग्य पद्धत!
दातून ६-८ इंच लांब आणि बोटाच्या जाडीचं असावं. टोक चावून ब्रशसारखं मऊ करायचं आणि दातांवर हळुवार घासायचं. सकाळी आणि संध्याकाळी दातून केल्याने तोंडाचं आरोग्य उत्तम राहतं. दातून करताना जमिनीवर बसण्याची पद्धत देखील शरीराला फायदेशीर मानली गेली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List