कधीही उडू शकते टोपी… ऑरेंज आणि पर्पल पॅपचा संघर्ष वाढला

कधीही उडू शकते टोपी… ऑरेंज आणि पर्पल पॅपचा संघर्ष वाढला

आयपीएलच्या पहिल्या चार आठवडय़ांत निकोलस पूरन आणि नूर अहमदने आपल्या डोक्यावर असलेल्या टोपीला पुणाला हातही लावू दिले नव्हते. मात्र आयपीएलच्या अर्धा टप्पा पूर्ण झाल्यापासून ही टोपी मिळवण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र झाल्यामुळे कोणत्याही सामन्यात पुणाचीही टोपी उडू शकते. एवढेच नव्हे तर ती टोपी आज एकाच्या तर उद्या दुसऱयाच्या डोक्यावर फिट बसू शकते.

फलंदाजीत अव्वल असलेला साई सुदर्शन आता 417 धावांनिशी ऑरेंज कॅप मिरवतोय, पण या आठवडय़ात विराट कोहली, सूर्यपुमार यादव, यशस्वी जैसवाल, मिचेल मार्श यांनी सलग दमदार खेळय़ा केल्यामुळे ऑरेंज कॅपचा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसतेय. काल विराट कोहलीने सलग दुसऱयांदा धावांची सत्तरी गाठत आपल्या एपूण धावसंख्या 392 वर पोहोचवली आहे. सुदर्शनप्रमाणे आयपीएलच्या या मोसमात त्यानेही पाच अर्धशतके ठोकली आहेत. परवा होणाऱ्या सामन्यात त्याच्या बॅटीतून अर्धशतकाची हॅट्ट्रिक झाली तर ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर दिसेल. तसेच निकोलस पूरन, जोस बटलर आणि मिचेल मार्श हेसुद्धा फार मागे नाहीत. एखादी झंझावाती अर्धशतकी खेळी कुणालाही टॉपवर पोहोचवू शकते आणि दुसऱ्या क्षणी मागे असलेला अन्य फलंदाज त्याची टोपी उडवू शकतो. आता एकाच वेळी दहा फलंदाज 300 पेक्षा अधिक धावा काढून टोपीच्या शर्यतीत धावत आहेत.

प्रसिधहेझलवूडमध्ये विकेटयुद्ध

प्रसिध पृष्णा गेला आठवडाभर टॉपवर आहे आणि त्याने 16 विकेट घेत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र काल हेझलवूडने राजस्थानच्या चार फलंदाजांची विकेट काढत प्रसिध पृष्णाची बरोबरी साधली आहे. फक्त प्रसिधने 8 सामन्यांत 16 विकेट टिपले तर हेझलवूडने 9 सामन्यांत. त्याचबरोबर  त्यांच्या मागे 15 गोलंदाज आहेत, ज्यांनी दहापेक्षा अधिक विकेट टिपत पर्पल कॅपवर आपलाही दावा ठोकला आहे. हर्षल पटेल असो किंवा साई किशोर नाहीतर पंड्या बंधू कुणीही पर्पल कॅपला मिळवू शकतो. प्रसिधकडे ही टोपी किती दिवस किंवा किती तास असेल, याचा अंदाज पुणीही बांधू शकत नाही. गोलंदाजांची यादी इतकी मोठी झाली आहे की येत्या आठवडय़ात पर्पल कॅपची संगीतखुर्ची सुरू होईल आणि एकेका दिवसासाठी किंवा काही तासांसाठी टोपी उडवण्याचा खेळ रंगेल. सामन्याबरोबर ऑरेंज आणि पर्पल कॅपचाही थरार क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे.

स्कोअरबोर्ड

चौकार – 1299

षटकार – 717

अर्धशतक – 84

शतक –3

विकेट – 514

3 विकेट – 38

धावा – 15191

सर्वाधिक धावा – साई सुदर्शन – 417

सर्वाधिक विकेट – प्रसिध कृष्णा – 16

आयपीएल गुणतालिक

संघ       सा.    वि.     .       गुण    नेररे

गुजरात  8   6  2  12    1.104

दिल्ली   8   6  2  12    0.657

बंगळुरू   9   6  3  12    0.482

मुंबई     9   5  4  10    0.673

पंजाब    8   5  3  10    0.177

लखनौ    9   5  4  10    -.054

कोलकाता    8  3  5   8    0.212

हैदराबाद    9  3  6   6 –   1.103

राजस्थान    9  2  7   4 –   0.625

चेन्नई     9   2  7  4   – 1.302

टीप – सा.-ः सामना, वि. – विजय,

.-ः पराभव, नेररे – नेट रनरेट

(ही आकडेवारी चेन्नईहैदराबाद सामन्यापर्यंतची आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम! मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी सोडला सुटकेचा नि:श्वास, पोस्ट व्हायरल भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम! मलायका अरोरासह अनेक सेलिब्रिटींनी सोडला सुटकेचा नि:श्वास, पोस्ट व्हायरल
ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेला तणाव आणि हल्ले आता संपले आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण...
‘आता भारताने पुन्हा रक्तपात करू नये…’ भारत-पाक युद्धविरामनंतर रवीना टंडनची पोस्ट व्हायरल
India Pakistan Ceasefire : शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल, हे दहशतवादाविरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवतं – शरद पवार
India Pakistan Ceasefire : दोन्ही देशांमध्ये समुद्र, हवाई आणि जमिनीवरील सर्व लष्करी कारवाया थांबवण्यावर सहमती – संरक्षण मंत्रालय
India Pakistan Ceasefire : युद्धविरामावर एकमत, पण दहशतवाद विरोधात कुठलीही तडजोड करणार नाही – एस जयशंकर
India Pakistan Tension – उल्हासनगर महापालिकेची वेबसाईट हॅक! पाकिस्तानी हॅकर्सकडून दावा
India Pakistan Ceasefire – हिंदुस्थानने आपल्या अटींवर युद्धविराम केला, परराष्ट्र मंत्रालयाची शस्त्रसंधीची घोषणा