रोजगाराच्या क्षेत्रातही आता ‘धारावी पॅटर्न’, कर्मचाऱ्यांच्या निवडीसाठी धारावीकरांना पसंती

रोजगाराच्या क्षेत्रातही आता ‘धारावी पॅटर्न’, कर्मचाऱ्यांच्या निवडीसाठी धारावीकरांना पसंती

आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी हे वर्षानुवर्षे चिकटलेले ‘बिरूद ‘ , मूलभूत सुविधांसाठीचा दैनंदिन संघर्ष, बेताची आर्थिक स्थिती, उच्च शिक्षणाचा अभाव, रोजगाराभिमुख शिक्षणाची वानवा, अनुभवाची कमतरता या आणि अशा अनेक कारणांमुळे धारावीतील उमेदवारांना बऱ्याचदा नावाजलेल्या कंपन्यांकडून नोकरीच्या संधी नाकारल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही वर्षभरापासून धारावी सोशल मिशनच्या (डीएसएम) माध्यमातून करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे चित्र काहीसे बदलले आहे.

नवभारत मेगा डेव्हलपर्स (एनएमडीपीएल) चा महत्त्वकांक्षी उपक्रम असलेल्या डीएसएममुळे खासगी कंपन्यांचा धारावीतील उमेदवारांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलतो आहे. नुकताच याचा प्रत्यय धारावीतील तरुणाईला आला. ८ मार्च २०२५ रोजी, डीएसएम ने महाराष्ट्र नेचर्स पार्क येथे आतापर्यंतचा सर्वात मोठा रोजगार मेळावा आयोजित केला. हा धारावीच्या सशक्तीकरणाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. १३०० हून अधिक उमेदवारांनी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि ४५०० पेक्षा जास्त जणांनी नोंदणी केली. टाटा स्टारबक्स, आयनॉक्स, स्वस्ति मायक्रोफायनान्स, श्रीराम फायनान्स, अर्बन कंपनी, कोटक एज्युकेशन फाउंडेशन, रिलायन्स स्मार्ट पॉइंट, टीमलीज, महिंद्रा अँड महिंद्रा, क्रिस्टल ग्रुप, डॉमिनोज, मॅकडोनाल्ड्स आणि पिझ्झा हट यासारख्या ५२ नामांकित कंपन्यांनी रिटेल, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, लॉजिस्टिक्स, फास्ट फूड चेन आणि होम सर्व्हिसेसमध्ये अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. तर याद्वारे ३०० हुन अधिक उमेदवारांना तिथेच थेट नोकरीची संधी मिळाली आणि यामुळे धारावीच्या क्षमतेविषयी असलेल्या चुकीच्या गृहितकांना ठोस उत्तर देखील मिळाले आहे.

धारावीतील तरुणांना मिळालेल्या नोकऱ्यांचा आढावा

धारावीतील रहिवासी असलेल्या २१ वर्षांची समृद्धी सिंह पवार हिला आसुस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह म्हणून ४.५७ लाखरुपयांची वार्षिक पगाराची नोकरी मिळाली आहे. “धारावी सोशल मिशनमुळे मला ही नोकरी मिळाली आणि माझ्या करिअरची दिशा बदलली. मी खूप आनंदी आहे,” असं समृद्धी आनंदाने सांगते. तर याच बरोबर रोहित वाघे, ज्याला ग्रीन मूनकेअर हेल्थकेअरमध्ये हाऊसकीपिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून १.५ लाख पॅकेजसह नोकरी मिळाली, तो म्हणतो की “या रोजगार मेळाव्यामुळे मला माझं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आणि योग्य नोकरी मिळाली आणि माझे आयुष्य देखील सुधारले.”

या रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंटचे बेदप्रकाश त्रिपाठी म्हणाले, “धारावी रोजगार मेळाव्यात भाग घेऊन आम्हाला चांगले उमेदवार भेटले.” तर अथेना बीपीओचे अल्बर्ट परेरा म्हणाले, “ही एक सामाजिक जबाबदारी आहे, आणि बँकिंग क्षेत्रातील संधींसाठी आम्ही धारावीतील अधिक उमेदवारांना संधी देण्यास इच्छुक आहोत.”

कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार संधी

टाटा स्टारबक्सने देखील या रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊन विशेषतः महिलांना नोकरी देण्यासाठी विशेष भर दिला. टाटा स्टारबक्सच्या सोनाली नाईक म्हणाल्या, “आम्ही फक्त महिलांसाठीच्या पदासाठी उमेदवार शोधत होतो. या रोजगार मेळाव्यात अनेक चांगले उमेदवार मिळाले आहेत. यातील बहुतांश उमेदवारांची निवड देखील करण्यात आली आहे. तर स्विगी इंस्टामार्टचे अजय सिंह म्हणाले की “१०वी-१२वी शिक्षण असलेल्या उमेदवारांना संधी दिली. त्यापैकी बहुतांश उमेदवार आमच्या पदांसाठी योग्य होते.” अशा अनेक नामांकित कंपन्यांनी आपला सहभाग दर्शवून धारावीतील अनेक तरुण – तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.

धारावीतील रोजगार मेळाव्याचा हा उपक्रम एकदाच झालेला नाही तर डीएसएमने मागील वर्षभरात दोन मोठे रोजगार मेळावे आणि दहा पेक्षा अधिक लहान रोजगार मेळावे घेतले आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवार आणि तिसऱ्या शुक्रवारी या लहान उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या उपक्रमांमध्ये आतापर्यंत २३०० पेक्षा अधिक उमेदवार सहभागी झाले असून ६०० हुन अधिक युवक – युवतींना नोकऱ्या मिळाल्या आहेत. सलून, ब्युटी पार्लर, हॉटेल, मोबाइल रिपेअरिंग, टेक सपोर्ट यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये धारावीतील तरुण आता काम करत आहेत.

धारावीतील तरुणांना नोकरी मिळवण्याआधीच डीएसम कडून कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. ब्युटी अँड वेलनेस, शिवणकाम, हॉस्पिटॅलिटी, इलेक्ट्रॉनिक रिपेअर, डिजिटल लिटरेसी यामध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाते. स्थानिक गरजांनुसार आखण्यात आलेले हे अभ्यासक्रम महिला, शाळा सोडलेले विद्यार्थी आणि नवउद्योजकांसाठी संधी निर्माण करत आहेत. धारावीचा पुनर्विकास जरी सुरु असला तरी डीएसएम हे सुनिश्चित करत आहे की इथल्या माणसांची प्रगतीही तितकीच महत्त्वाची आहे. इथे केवळ इमारती उभ्या राहत नाहीत तर येथील नागरिकांचे भविष्य देखील उज्वल करत आहे. डीएसएमने आजवर राबविलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून हेच सिद्ध होते की ” प्रतिभा आणि विविध गुण सर्व युवक – युवतींमध्ये असतात. मात्र या युवा वर्गाला योग्य संधी उपलब्ध करून देणें तितकेच महत्वाचे असते. आणि याच प्रतिभावंत युवा वर्गाला संधी उपलब्ध करून देण्याचे काम डीएसएम करत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Chagan Bhujbal : मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान, छगन भुजबळांनी पुन्हा काढले अस्त्र, त्या वक्तव्याने आता वाद पेटणार Chagan Bhujbal : मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान, छगन भुजबळांनी पुन्हा काढले अस्त्र, त्या वक्तव्याने आता वाद पेटणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्धाची ठिणगी पडली आहे. छगन भुजबळ यांनी पहिली तोफ डागली आहे....
रणधीर सावरकरांनी गाजवले अर्थसंकल्पीय अधिवेशन, अकोल्याचे प्रश्न सरकारसमोर मांडले
बिग बॉस फेम अभिनेत्रीचा मोठा निर्णय; इंडस्ट्री सोडून या मार्गावर वाटचालीचा निर्णय
अवकाळी पाऊस-गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, मात्र पंचनाम्याचे आदेश देण्यास सरकारला फुरसत नाही – विजय वडेट्टीवार
पुढच्या तीन चार तासांत उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हवामान विभागाचा इशारा
Jalana News मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
पाकिस्तानी नागरिकाची पंजाब सीमेवरून हिंदुस्थानात घुसखोरी, बीएसएफने घेतले ताब्यात