Pahalgam Terrorist Attack – दहशतवाद्यांनी धर्म विचारून जीव घेतला, यांना ठेचलच पाहिजे – अंबादास दानवे
जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला हा संतापजनक आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून जीव घेतला. या दहशतवाद्यांना तर ठेचलच पाहिजे, असा संताप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दावने यांनी व्यक्त केला आहे.
अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर (X) पोस्ट करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला हा संतापजनक आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून जीव घेतला. हे दहशतवादी तर ठेचले पाहिजेतच. पण यांना मदत करणाऱ्यांना पण वेचून वेचून यमसदनी पाठवायला हवे. काश्मिरात कलम 370 हटून पर्यटक वाढला असेल, पण त्याला सुरक्षा दिली जाणार नसेल तर, ही सगळी टाकलेली पाऊले व्यर्थ आहेत, असं ते म्हणाले आहेत.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला हा संतापजनक आहे. दाहशतवाद्यांनी धर्म विचारून जीव घेतला. हे दहशतवादी तर ठेचले पाहिजेतच. पण यांना मदत करणाऱ्यांना पण वेचून वेचून यमसदनी पाठवायला हवे. काश्मिरात कलम ३७० हटून पर्यटक वाढला असेल, पण त्याला सुरक्षा दिली जाणार नसेल तर ही सगळी टाकलेली…
— Ambadas Danve (@iambadasdanve) April 22, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List