IPL 2025 – भाऊ तुला मानलं! युवा खेळाडूंसाठी शिवम दुबेकडून लाखमोलाच्या मदतीची घोषणा
IPL 2025 चेन्नई सुपर किंग्जचा खेळ आत्तापर्यंत तरी लौकिकाला साजेसा झालेला नाही. ऋतुराज गायकवाडच्या जागी महेंद्र सिंग धोनीने संघाची सुत्र आपल्या हाती घेतली आहेत. परंतु संघाला अजूनतरी सुर गवसलेला नाही. सध्या गुणतालिकेत चेन्नई खालून पहिल्या क्रमांकावर आहे. अशातच चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर शिवन दुबेने मनाचा मोठेपणा दाखवत तामिळनाडूमधील 10 युवा खेळाडूंना 7 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवम दुबेचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
तामिळानाडूमध्ये स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशनच्या पुरस्कार आणि शिष्यवृत्ती कार्यक्रमादरम्यान त्याने मदतीची घोषणा केली आहे. तामिळनाडूच्या 10 युवा खेळाडूंना 70-70 हजार रुपये देणार असल्याचे अश्वासन त्याने दिले आहे. त्याचबरोबर TNSJA च्या माध्यामातून खेळाडूंना प्रत्येकी 30 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व 10 खेळाडूंना आता प्रत्येकी 1-1 लाख रुपये मिळणार आहेत. शिवम दुबेच्या या निर्णयामुळे खेळाडूंना चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी मदत होणार आहे.
पीबी अभिनंदन (टेबल टेनिस), केएस वेनिशा श्री (तिरंदाजी), मुथुमीना वेल्लासामी (पॅरा ॲथलेटिक्स), शमीना रियाझ (स्क्वॉश), जयंत आरके (क्रिकेट), एस नंदना (क्रिकेट), कमली पी (सर्फिंग), आर अबिनाया (ॲथलेटिक्स), आरसी जितीन अर्जुनन (ॲथलेटिक्स), ए तक्षनाथ (बुद्धिबळ) या 10 खेळाडूंना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List