मुरबाड तालुक्यातील धसईत गारपीट, वीज पडून तरुणीचा मृत्यू

मुरबाड तालुक्यातील धसईत गारपीट, वीज पडून तरुणीचा मृत्यू

मुरबाड तालुक्यातील धसई परिसरात रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसात अंगावर वीज पडल्यामुळे रविना सांडे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तिने नुकतीच बारावी परीक्षा दिली होती. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

धसईलगतच्या अल्याणी गावातील रविना सांडे (18) ही दुचाकीवरून वडील राजाराम सांडे यांच्याबरोबर धसईकडून घराकडे जात होती. अचानक पाऊस सुरू झाल्यानंतर वडील आणि मुलगी एका घराबाहेर थांबले होते. पाऊस कमी झाल्यानंतर घरी जाऊ असे तिच्या वडिलांनी तिला सांगितले. ते दोघेही पाऊस उघडण्याची वाट पाहत असताना अचानक रविनाच्या अंगावर वीज पडली. या दुर्घटनेत रविना गंभीर जखमी झाली. तिला स्थानिक रहिवाशांनी तातडीने टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रविनाने नुकतीच बारावी परीक्षा दिली होती.

वीटभट्टीचालकांचे मोठे नुकसान
मुरबाड तालुक्यात रविवारी अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टीचालकांचे मोठे नुकसान झाले. भाजण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विटा भिजल्या. पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. गुरांसाठी साठवण्यात आलेला चाराही अनेक ठिकाणी भिजला. वादळीवाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडली. ज्या शेतकऱ्यांचे या पावसात नुकसान झाले आहे, त्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून शासकीय मदत देण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया तहसीलदार अभिजित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता
बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही जोडप्यांच्या घटस्फोटाची चर्चा आजसुद्धा होते. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग. या दोघांनी...
“कसलाच पश्चात्ताप नाही..”; अमृताला कानाखाली वाजवल्याप्रकरणी अखेर ईशाने सोडलं मौन
मित्राला वाचवायला गेला, त्याचाच जीव गेला; आत्महत्येसाठी गेलेला मित्र रेल्वे येताच बाजूला झाला अन्…
साताऱ्यात हिवराच्या शेंगा खाल्ल्याने शाहूपुरीत 26 मेंढ्यांचा मृत्यू
पुण्यात पहारेकरी पगाराविनाच, ईगल कंपनीने साडेसहाशे सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवले
भीमा नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूउपसा सुरू; गढूळ पाण्यामुळे बठाण, उचेठाणच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
पुणे विमानतळावर बिबट्याचा वावर