चैत्यभूमीवर मिंधे आणि अजितदादांच्या भाषणाला कात्री, महायुतीत धुसफुस सुरूच

चैत्यभूमीवर मिंधे आणि अजितदादांच्या भाषणाला कात्री, महायुतीत धुसफुस सुरूच

महायुती सरकारमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्दय़ावरून धुसफुस सुरूच आहे. रायगडावर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधीच देण्यात आली नाही. चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित अभिवादनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाला ऐनवेळी कात्री लावण्यात आली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिंदे यांनी थेट ठाणे गाठले.

  • राज्यपालांच्या भाषणानंतर 10 वाजून 10 मिनिटांनी अजित पवार तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी 10 वाजून 15 मिनिटांची वेळ देण्यात आली होती. पण दोन्ही नेत्यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. चैत्यभूमीवर अभिवादन केल्यानंतर फक्त मुख्यमंत्री आणि राज्यपालांचेच भाषण झाले.

कार्यक्रम पत्रिका रात्रीच बदलली

भाषणासाठी आपले नाव घेण्यात न आल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱयांना जाब विचारला. त्यावर अधिकाऱयांनी तुमचे नाव भाषणाच्या पत्रिकेत नसल्याचे स्पष्ट केले. यावर शिंदे यांनी कार्यक्रम पत्रिकाच दाखवली, पण संबंधित अधिकाऱयांनी कार्यक्रम पत्रिकेत काल रात्रीच बदल करण्यात आल्याचे सांगत शिंदे यांची बोलतीच बंद केली. दरम्यान, शिंदे यांनी कार्यक्रम पत्रिका बदलणाऱया अधिकाऱ्याची चौकशी सुरू केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता
बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही जोडप्यांच्या घटस्फोटाची चर्चा आजसुद्धा होते. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग. या दोघांनी...
“कसलाच पश्चात्ताप नाही..”; अमृताला कानाखाली वाजवल्याप्रकरणी अखेर ईशाने सोडलं मौन
मित्राला वाचवायला गेला, त्याचाच जीव गेला; आत्महत्येसाठी गेलेला मित्र रेल्वे येताच बाजूला झाला अन्…
साताऱ्यात हिवराच्या शेंगा खाल्ल्याने शाहूपुरीत 26 मेंढ्यांचा मृत्यू
पुण्यात पहारेकरी पगाराविनाच, ईगल कंपनीने साडेसहाशे सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवले
भीमा नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूउपसा सुरू; गढूळ पाण्यामुळे बठाण, उचेठाणच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
पुणे विमानतळावर बिबट्याचा वावर