महिला आरक्षण कधी लागू करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

महिला आरक्षण कधी लागू करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे. न्यायालयाने सांगितले की, सरकारने हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की महिला आरक्षण कायदा लागू करण्याची वेळापत्रक काय आहे. संसदेने हा कायदा मंजूर केल्यानंतरही तो लागू करण्यात उशीर का केला जात आहे? असा सवालही कोर्टाने विचारला आहे.

कॉंग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी दाखल केलेल्या याचिकेत मागणी करण्यात आली होती की महिला आरक्षण तात्काळ लागू करावे. याचिकेत म्हटले होते की, कायद्यात घालण्यात आलेली ‘परिसीमन (Delimitation) नंतर लागू करण्याची’ अट काढून टाकावी आणि आरक्षण तातडीने अमलात आणावे.

सुनावणीदरम्यान, वरिष्ठ वकील शोभा गुप्ता यांनी सांगितले की, हा कायदा जेव्हा ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ या नावाने पारित झाला, तर तो लागू करण्यात विलंब का केला जात आहे? त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटल्यानंतरही महिलांना संसदेमध्ये प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आरक्षणाची मागणी करावी लागत आहे, हे दुर्दैवी आहे. गुप्ता यांनी पुढे सांगितले की, एससी-एसटीसाठी आरक्षण लागू करण्यासाठी जनगणना किंवा परिसीमनाची अट नसते, मग महिलांसाठीच ती अट का घालण्यात आली? त्यांनी हेही नमूद केले की, संसदेने हा कायदा विशेष अधिवेशनात मंजूर केला, म्हणजेच सरकारकडे आवश्यक डेटा आधीपासूनच उपलब्ध होता.

न्यायमूर्ती जे. नागरत्ना यांनी निरीक्षण केले की, महिला या देशातील सर्वात मोठ्या ‘अल्पसंख्याक’ गटात मोडतात. त्यांनी केंद्र सरकारला विचारले की, परिसीमनाची प्रक्रिया नेमकी केव्हा सुरू होणार आहे? सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, कायदा लागू करणे हे सरकार आणि कार्यकारी यंत्रणेचे कर्तव्य आहे, मात्र कोर्ट याची विचारणा करू शकते की त्यासाठी ठरवलेली वेळमर्यादा काय आहे.

त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस जारी केली असून निर्देश दिले आहेत की सरकारने जनगणना आणि परिसीमन प्रक्रिया कधी सुरू होईल आणि महिला आरक्षण प्रत्यक्षात कधी लागू केले जाईल, हे स्पष्ट करावे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सूर्यनमस्कार करण्याच्या स्टेप्स कोणत्या? लगेच जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याच्या स्टेप्स कोणत्या? लगेच जाणून घ्या
तुम्ही रोज सूर्यनमस्कार घातले तर तुम्ही आरोग्यदायी जीवन जगू शकतात. आता सूर्यनमस्काराचे 12 आसन कोणते आहेत, त्याचे काय फायदे आहेत,...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम पाडणार; क्रीडा मंत्रालय उभारणार ‘स्पोर्ट्स सिटी’
छत्तीसगडमध्ये महिला माओवाद्याचे तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण
पारंपारिक शेतीऐवजी नवीन वाट स्विकारली, निवृत्त सैनीकाने केला हळद लागवडीचा अनोखा प्रयोग
तरुणीने ब्लॅकमेल केलं! दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूला जीवे मारण्याची धमकी
पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणातील मारेकरी सुरक्षा रक्षकाच्या जन्मठेपेवर शिक्कामोर्तब; फाशी सुनावण्यास हायकोर्टाचा नकार
निळी साडी, मोकळे केस अन् मादक नजर; सोशल मीडियावर ट्रेंड होणारी ‘ही’ अभिनेत्री आहे तरी कोण?