एक मिनिटाच्या उशिराने 50 हून अधिक जणांची परीक्षा हुकली, रोहित पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या विविध पदांसाठी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहेत. यामध्ये पुण्यातील रामवाडी येथील TCS ION केंद्रांवर एक मिनाटाचा उशीर झाल्याने परीक्षार्थिंना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्ट टॅग करत विनंती केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात,’मोठ्या मेहनतीने विद्यार्थी परीक्षेची तयारी करून येत असतात. अशात विद्यार्थ्यांना थेट संधी नाकारली जाण योग्य नाही. परिणामी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने सदरील विषयात लक्ष घालून ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला उशीर झाला आहे अशा व्यक्तींना दुसरी एक संधी देण्याबाबत सकारात्मक विचार करावा ही विनंती’.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या विविध पदांसाठी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहेत. यामध्ये पुण्यातील रामवाडी येथील TCS ION केंद्रांवर केवळ 1 मिनिट उशिरा आल्याच्या कारणावरून तब्बल 50 हून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नसल्याची घटना समोर आली आहे.
मोठ्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 10, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List