फर्रुखाबादमध्ये विमान दुर्घटना टळली, धावपट्टी सोडून विमान झुडपात घुसले

फर्रुखाबादमध्ये विमान दुर्घटना टळली, धावपट्टी सोडून विमान झुडपात घुसले

उत्तरप्रदेशच्या फर्रुखाबाद जिल्ह्यात विमान दुर्घटना घडली आहे. एक खासगी विमान टेकऑफ दरम्यान धावपट्टीवरुन घसरले आणि झुडपात आदळले. ही घटना आज 9 ऑक्टोबर रोजी फर्रुखाबादमधील नंदन एअरस्ट्रिपवर घडली. ही एक छोटी एअरस्ट्रिप आहे जी प्रामुख्याने खाजगी आणि प्रशिक्षण उड्डाणांसाठी वापरली जाते. या अपघातात विमानाचे किरकोळ नुकसान झाले, परंतु पायलट आणि प्रवासी दोघेही सुरक्षित असल्याचे वृत्त आहे.

वृत्तानुसार, हे विमान जेट सर्व्हिस एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे ​​होते, ज्याचा नोंदणी क्रमांक VT-DEZ होता. गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास हे विमान उड्डाणाच्या तयारीत होते तेव्हा त्याचे नियंत्रण सुटले आणि धावपट्टीवरून झुडुपात अडकले. अपघाताच्या वेळी, एक पायलट आणि एका बिअर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विमानात होते, जे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले होते.

विमान फरुखाबादच्या नंदन विमानपट्टीवरुन टेकऑफसाठी तयार होते. ही विमानपट्टी जवळपास 1000 मीटर लांब आणि घनदाट जंगलात आहे. पायलटने रनवेवर स्पीड वाढवला, मात्र जसे विमानाने उड्डाण करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी विमानाची एक बाजू खाली झुकली आणि विमान रनवेवरुन घसरले. जवळपास 50-60 मीटर दूर झुडपात घुसले.

एका वॉचमेनने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओत विमान रनवेवरच घसरल्याचे स्पष्ट होते. ते आकाशात क्रॅश झाले नाही. लोकल पोलीस आणि विमानतळ प्रशासनाने 5 मिनीटात घटनास्थळी पोहोचून क्रूला सुरक्षित बाहेर काढले. कोणतीही आग लागलेली नाही, मात्र विमानाला प्रचंड नुकसान झाले. डीजीसीए आणि लोकल पोलीसांच्या माहितीनुसार, रनवेवर पावसामुळे चिखल आणि खड्ड्यांमुळे नियंत्रण सुटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेट्रो रेल्वे-3 चा प्रवास सुसाट, पण  भुयारी मार्गात इंटरनेट ‘ब्लॉक’; प्रवाशांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी मेट्रो रेल्वे-3 चा प्रवास सुसाट, पण भुयारी मार्गात इंटरनेट ‘ब्लॉक’; प्रवाशांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी
मुंबई मेट्रो टप्पा–3 वरील जेव्हीएलआर ते कफ परेड मार्गावरील भुयारी मेट्रो रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची संख्याही लवकरच...
एसटी आरक्षण केंद्राच्या श्रेयासाठी कुरघोडी! अर्धवट काम, मूलभूत सुविधांची वानवा तरी उद्घाटन उरकले, कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
संकल्प विजयाचा… मुंबई जिंकण्याचा! शिवसेनेचा सोमवारी निर्धार मेळावा; उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन, विभागप्रमुख ते उपशाखाप्रमुखांची उपस्थिती
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्र भाऊबीज, ठाकरे कुटुंबात नात्यांचा गोडवा द्विगुणित
एसआयटी चौकशीत मतचोरीच्या रेटकार्डचा पर्दाफाश, 80 रुपयांत एक मत खाल्ले! डेटा ऑपरेटरने तब्बल 6018 नावे कापली!!
पैसे आणायचे कुठून? पूरग्रस्तांच्या पॅकेजचे अर्थ खात्याला टेन्शन! योजनांना कात्री लागणार
मुख्यमंत्री पदासाठी तेजस्वी आघाडीचा चेहरा, बिहारच्या उपमुख्यमंत्री पदासाठी व्हीआयपीचे साहनी यांचे नाव