लाडकी बहीण योजने प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम का जमा करत नाहीत? सुप्रिया सुळे यांचा सवाल

लाडकी बहीण योजने प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम का जमा करत नाहीत? सुप्रिया सुळे यांचा सवाल

निवडणुकीपूर्वी ज्या प्रमाणे लाडकी बहीण साठी पैसे थेट खात्यात जमा केले होते, तसेच शेतकऱ्यांना का मदत दिली जात नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. तसेच पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांना जे लोक कर्जाची नोटीस पाठवत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजनेला सरकारने पैसे दिले होते. मग तेवढाच उदारपणा सरकारने दाखवावा तीच यंत्रणा आमच्या शेतकरी बंधूंसाठी लावा. काल इंदापूर मध्ये कळलं की विहिरीला पैसे मिळणार नाहीत. आमच्या शेतकरी भावांना जो तुमचा आमचा अन्नदाता आहे तो मातीशी ईमान राखतो, तुमच्या आणि माझ्या आपल्या अन्नाचा प्रश्न सोडवतो कष्टाने त्याच्यासाठी साठी एवढे किंतू परंतु निर्णय कशासाठी? एवढा वेळ का होतोय? पटकन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर का होत नाहीये? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

तसेच पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांना कर्ज भरण्याच्या नोटीसा जात आहेत. अशा लोकांवर खटले दाखल करा असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND vs AUS – विराट कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद, एडलेडमध्येही ‘भोपळा’ फोडू शकला नाही IND vs AUS – विराट कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद, एडलेडमध्येही ‘भोपळा’ फोडू शकला नाही
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात एडलेडच्या ओव्हल मैदानावर दुसरा वन डे सामना सुरू आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने आजची लढत जिंकून...
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दिवाळे निघाले; 12 वर्षातील विक्रमी घसरण
बिहारच्या चार कुख्यात गँगस्टरचं दिल्लीत एन्काऊंटर, विधानसभा निवडणुकीत दहशत पसरवण्याचा होता डाव
भाऊबीज म्हणजे यम द्वितीया; जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
PF खात्यातून लग्न आणि घर खरेदीसाठी एक वर्षानंतरच काढता येणार पैसे, ‘या’ नियमात झाला बदल
जगभरातील ४० टक्के लोक न्यूरोलॉजिकल आजारांनी ग्रस्त, WHO ने व्यक्त केली चिंता
IND vs AUS – ऑस्ट्रेलियात फेरफटका मारताना गिलसोबत पाकिस्तानी चाहत्याची नापाक हरकत, हस्तांदोलन करत म्हणाला…