जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू

जम्मू श्रीनगर येथील रामबन जिल्ह्यामध्ये शुक्रवारी भीषण अपघात घडला आहे. श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरुन एक एसयूव्ही गाडी घसरुन दरीत पडली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर घटनास्थळी पोलीस, बचाव पथक पोहोचून मृतदेह बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एक एसयूव्ही गाडी श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरुन घसरुन दरीत पडली. या अपघातात 10 लोकांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसारस ही गाडी श्रीनगर येथून जम्मू ला जात होती. आणि मध्यरात्री एकच्य़ा सुमारास रामबन जिल्ह्याच्या बॅटरी चष्मा परिसरात 300 फूट खोल दरीत पडली. यात 10 जणांचा मृत्यू झाला असून सर्व प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे मृतदेह बाहेर काढणे कठिण जात होते. मृतांमध्ये कार चालक जम्मूचे अंब घ्रोथाच्या बलवान सिंह (47) आणि बिहारचे पश्चिमी चंपारणचे विपीन मुखिया भैरगंग यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भोसरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा भोसरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा
शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीत उद्या (दि.१० मे) भोसरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
'सुप्रियाताई चतुर्थीला अन् अमोल कोल्हे एकादशीला मटन खातात'; मिटकरींचा हल्लाबोल
चित्रपट मिळत नसताना ही कसा चालतो गोविंदाचा घर खर्च, पाहा कुठून करतो करोडोंची कमाई
दहापेक्षा अधिक अकाउंट, धर्माकडे झुकाव, ‘तारक मेहताच्या सोढी’चे बेपत्ता होण्याचे रहस्य अखेर..
पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने, डॉ. मुणगेकरांनी केली टीका
तीन टप्प्यांचं मतदान हे मोदींना अस्वस्थ करणारं; शरद पवार यांचं मोठं भाकित
संदेशखळीतील एका महिलेकडून बलात्काराची तक्रार मागे, भाजप नेत्यांनी खोटी तक्रार केल्याचा आरोप