हिंदुस्थानच्या कुठल्याही कोपऱ्यात घुसून लढण्याची क्षमता, पाकिस्तानी सैन्याची धमकी

हिंदुस्थानच्या कुठल्याही कोपऱ्यात घुसून लढण्याची क्षमता, पाकिस्तानी सैन्याची धमकी

‘भविष्यात हिंदुस्थानशी संघर्ष झालाच तर तो महाप्रलय घेऊन येईल. पाकिस्तान किंचितही मागे हटणार नाही आणि संयमही बाळगणार नाही. हिंदुस्थानच्या कुठल्याही कोपऱ्यात घुसून लढण्याची आमची क्षमता आणि तयारी आहे,’ अशी धमकी पाकिस्तानी सैन्याने दिली आहे.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्या अलीकडच्या वक्तव्यांवर पाकिस्तानी सैन्याने ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘जगाच्या नकाशावर राहायचे असेल तर शेजारी देशाने आमच्या विरोधात दहशतवाद पोसणे बंद करावे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी आम्ही जो संयम दाखवला तसा यापुढे दाखवणार नाही. हिंदुस्थानी सैन्याने त्यासाठी तयार राहावे,’ असे द्विवेदी म्हणाले होते, तर पाकिस्तानची किमान डझनभर लढाऊ विमाने पाडल्याचा दावा एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी केला होता.

हिंदुस्थानी अधिकाऱयांच्या इशाऱयानंतर पाकिस्तान संतापला आहे. पाकिस्तानी लष्कराने निवेदन प्रसिद्ध करून धमकी दिली आहे. ‘हिंदुस्थानातील सुरक्षा दलातील सर्वोच्च अधिकाऱयांनी व्यक्त केलेली मते प्रक्षोभक आणि चिंताजनक आहेत. हिंदुस्थान पुन्हा संघर्षाच्या तयारीत असल्याचे यातून दिसते, पण आम्हीही सज्ज आहोत. पाकिस्तान यापुढे शत्रूला वेगळय़ा पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहे. ही पद्धत वेगवान, निर्णायक आणि विध्वंसक असेल. शत्रूच्या कुठल्याही प्रदेशात जाऊन लढण्याची आमची क्षमता आहे. नकाशावरून पुसले जाण्याचीच वेळ आली तर तीन दोन्ही बाजूंवर येईल, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

गमावलेली प्रतिष्ठा मिळवण्याचा मोदींचा प्रयत्न

पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक्सवर पोस्ट करून तीव्र प्रतिक्रिया दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान झालेल्या दारुण पराभवामुळे पंतप्रधान मोदी व त्यांच्या पक्षाने विश्वासार्हता गमावली आहे. हिंदुस्थानी अधिकाऱ्यांची विधाने हा नेतृत्वाची कलंकित प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तान हा अल्लाहच्या नावाने स्थापन झालेला देश आहे. आमचे जवान अल्लाहचे सैनिक आहेत. त्यामुळे भविष्यात युद्ध झालेच तर हिंदुस्थान त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱयाखाली गाडला जाईल, असे आसिफ म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमेरिकेतील ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अंदाधुंद गोळीबार, एका विद्यार्थ्यासह 3 जण जखमी अमेरिकेतील ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अंदाधुंद गोळीबार, एका विद्यार्थ्यासह 3 जण जखमी
अमेरिकेतील ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीच्या निवासी सभागृहात रविवारी पहाटे अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात एका विद्यार्थ्यासह तीन जण जखमी झाले....
टीम इंडियासाठी खेळणारा जम्मू-कश्मिरचा पहिला खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये २३ कोटींची दारू जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
Photo – पहिला दिवा महाराजांच्या चरणी! शिवभक्तांनी किल्ले रायगडावर साजरा केला दीपोत्सव
अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल आवाजात रंगली दिवाळी पहाट, नांदेडकरांचा तुफान प्रतिसाद
महावितरणच्या गलथान कारभार शेतकर्‍यांच्या मुळावर, शॉर्ट सर्किटमुळे तब्बल 30 ते 40 एकर ऊस जळून खाक
Hongkong Flight Accident – विमान धावपट्टीवरुन घसरुन समुद्रात पडले, दोघांचा मृत्यू