Bihar SIR – मतदार याद्यांमध्ये अजूनही विसंगती, महाराष्ट्रातही अशाच प्रकारची मत चोरी झाली; काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

Bihar SIR – मतदार याद्यांमध्ये अजूनही विसंगती, महाराष्ट्रातही अशाच प्रकारची मत चोरी झाली; काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मतदार याद्यांमध्ये अजूनही विसंगती आढळत आहेत. महाराष्ट्रातही अशाच प्रकारची मत चोरी झाली, असं म्हणत काँग्रेसने बिहार एसआयआरवरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. आज बिहारमध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना बिहार काँग्रेस पक्षाचे नेते शकील खान म्हणाले की, “भाजप सर्व स्वायत्त संस्थांना बिघडवण्यात व्यस्त आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगासमोर ११ प्रश्न ठेवले आहेत, ज्यांची उत्तरे आम्हाला अजूनही हवी आहेत.”

शकील खान म्हणाले की, “मतदार यादीत अजूनही विसंगती आढळत आहेत. महाराष्ट्रातही अशाच प्रकारची मत चोरी झाली आहे. आम्ही बिहारमधील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करतोय. ते (भाजप) बिहारमध्ये मते चोरू इच्छितात. आम्ही निवडणूक आयोगाच्या उत्तराची वाट पाहत आहोत.”

एसआयआरवरून बिहार कांग्रेस अध्यक्ष राजेश राम यांनी निवडणूक आयोगाला मागणी केली आहे की, “एसआयआरमधून स्थलांतर केल्यानंतर ज्या लोकांची नावे वगळण्यात आली त्यांची यादी जाहीर करावी. फॉर्म ६ई द्वारे जोडलेल्या नावांची यादी देखील देण्यात यावी. किती महिलांची नावे वगळण्यात आली आणि किती नवीन यादीत समाविष्ट करण्यात आली, याची यादी देखील जाहीर करावी.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यातील कॉलेजने लंडनमधील नोकरी हिरावली, दलित तरुणाच्या आरोपाने खळबळ पुण्यातील कॉलेजने लंडनमधील नोकरी हिरावली, दलित तरुणाच्या आरोपाने खळबळ
‘पुण्यातील महाविद्यालयाने माझी कागदपत्रे पडताळणी नाकारल्याने मला लंडनमधील नोकरीला मुकावे लागले,’ असा आरोप एका दलित तरुणाने केला आहे. ‘केवळ दलित...
लोकसंस्कृती- लोककलेतील भजनी मंडळे
अवतीभवती – दोन मजली विहीर
संस्कृतायन- मैत्रीची सप्तपदी
अर्थविशेष – मुहूर्ताची खरेदी
मंथन – वैद्यकशास्त्रातील नोबेलचा अन्वयार्थ
दिवाळी विशेष – मोठय़ा कुटुंबासोबत दिवाळी