मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू

मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू

मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयत म्यानमार या देशातील रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याचे कळते.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही इनोव्हा कार मुंबईहून जगन्नाथपुरीकडे निघाली होती. मात्र समृद्धी महामार्गावर वाशिम जवळच्या मालेगाव ते जऊळका दरम्यान कॉरिडॉर क्रमांक 232 जवळ कारचा भीषण अपघात झाला. गाडीचा वेग जास्त असल्याने कार रस्त्याच्या कडेचा लोखंडी कठडा तोडून खाली कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर कारच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. यात दोन जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथकाने धाव घेतली आहे.

ट्रकला लागली आग

दरम्यान, शुक्रवारी दुपारी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ट्रकला अचानक आग लागली. ट्रकपर्यंत पोहोचायला अग्निशमन दलाला उशिर लागल्याने आगीत ट्रक आणि आतील सामान पूर्ण जळून खाक झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;