शेततळ्यात मृत माशांचा खच; पाणीही दूषित! मलगुंडे धनगरवाडा येथील प्रकार, अज्ञाताने विषारी पदार्थ टाकल्याचा संशय!

शेततळ्यात मृत माशांचा खच; पाणीही दूषित! मलगुंडे धनगरवाडा येथील प्रकार, अज्ञाताने विषारी पदार्थ टाकल्याचा संशय!

एक जिद्दी माणूस धनगर वाडय़ासारख्या पठारावर शेती करून नानाविध प्रयोग करतो. सामाजिक कार्याबरोबरच मत्स्यप्रकल्प साकारून तो यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट घेतो. मात्र, घास तोंडात जाण्यापूर्वीच तो हिरावला गेल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील म्हासुर्ली पैकी मलगुंडे धनगरवाडा येथील एका शेतकऱयाच्या शेततळ्यात मृत माशांचा खच पडला असून, माशांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

एकतर फूड पॉयझन किंवा अज्ञात इसमाने जाणूनबुजून विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱयाचे प्रचंड नुकसान झाले असून, या घटनेमुळे तळय़ातील पाणीही दूषित झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.

राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली पैकी मलगुंडे धनगरवाडा येथे धोंडीराम मलगुंडे यांचे गट नंबर 453 मध्ये 16 गुंठय़ांत शेततळे असून, त्यात त्यांनी मत्स्यपालन केले आहे. दीड वर्षांपूर्वी त्यांनी रोहू, कटला जातीचे मासे शेततळ्यात सोडले होते. माशाची साईज एक ते दीड किलोप्रमाणे असून, त्यांची पूर्ण वाढ झालेली होती. मात्र, आज मलगुंडे हे माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेले असता तळय़ात मृत माशांचा खच पाहून हादरून गेले. शेततळय़ात मासे मृत होऊन तरंगलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आले.

या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, त्यादृष्टीने तपासणी सुरू आहे. याबाबत तलाठी, पोलीस पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

दरम्यान, शेततळ्यात माशांचा मृत्यू झाल्यानंतर मलगुंडे यांनी एफबीआय फॉरेन्सिक लॅब कोल्हापूर येथील तज्ञांकडे आपल्या शेततळ्यातील पाणी आणि मासे तपासणीला पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच याबाबतचे कारण स्पष्ट होणार आहे. याबाबत पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली नसून, अहवाल आल्यानंतरच तक्रार देणार असल्याचे मलगुंडे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वेल्डिंग करताना टँकरचा स्फोट; खानावळ चालकाचा दुर्दैवी मृत्यू वेल्डिंग करताना टँकरचा स्फोट; खानावळ चालकाचा दुर्दैवी मृत्यू
कामगार चौकात ऑइल टैंकरला वेल्डिंग करत असताना टँकरच्या टाकीचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, या टाकीचा...
दंगल फेम अभिनेत्री जायरा वसीमने केला निकाह; सोशल मीडियावर फोटो केले शेअर
मुंबईहून जगन्नाथपुरीला जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, म्यानमारच्या दोन नागरिकांचा जागीच मृत्यू
अफगाणिस्तानमध्ये जर जय व अमित शहा असते तर सट्टेबाजीसाठी ते देखील पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळले असते, संजय राऊत यांची जोरदार टीका
मतदार यादीतीला घोटाळा हा मराठी माणसाची पिछेहाट करण्यासाठी – संजय राऊत
जमीन खरवडून गेली, आता पाण्यावरची शेती! धाराशिवच्या पालकमंत्र्याचा ‘प्रताप’
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, बेल्जियम कोर्टाची मान्यता