भाजपचा असा सेवा पंधरवडा! रुग्णाला बिस्कीटचा पुडा दिला, फोटो काढला आणि परत घेतला, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल

भाजपचा असा सेवा पंधरवडा! रुग्णाला बिस्कीटचा पुडा दिला, फोटो काढला आणि परत घेतला, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राजस्थानची राजधानी जयपूर येथील रुग्णालयात फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णाला दिलेला बिस्कीटचा पुडा फोटो काढून झाल्यावर परत घेतला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या या लाजीरवाण्या कृतीमुळे जोरदार टीका होत आहे.

जयपूर येथील आरयूएचएससी एमएस रुग्णालयातील भाजपचा सेवा पंधरवडा भाजप कार्यकर्त्यांच्या लाजीरवाण्या कृतीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ज्या मतदारसंघातून निवडून आले, त्या सांगानेर मतदारसंघातील कर्करोग रुग्णालयात भाजप पदाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी रुग्णांना बिस्कीट व फळवाटपाचे आयोजन केले होते. यादरम्यान भाजपची एक महिला कार्यकर्ती रुग्णाला दिलेला दहा रुपये किमतीचा बिस्कीटचा पुडा फोटो काढल्यावर परत घेऊन तो पिशवीत ठेवताना दिसत आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भाजपकडून फक्त दिखाव्यासाठी करण्यात येत असलेल्या या कार्यक्रमावरून सर्वत्र जोरदार टीका होत आहे.

मार्केटिंग स्टंट कशासाठी?

गरीब आणि आजारी असलेल्या लोकांचा फक्त फोटो काढून घेण्यासाठी भाजपकडून वापर करण्यात येत आहे. १००-२०० रुपयांच्या वस्तू घ्यायच्या आणि त्याच वाटप करून फोटो काढले जातात. रुग्णसेवेच्या नावाखाली हा मार्केटिंग स्टंट कशासाठी केला जात आहे, असा संताप व्यक्त केला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जर तुम्ही एकाच वेळी 50 अंडी खाल्लीत तर काय होईल? सत्य जाणून धक्का बसेल जर तुम्ही एकाच वेळी 50 अंडी खाल्लीत तर काय होईल? सत्य जाणून धक्का बसेल
अंडी आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाची असतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. कारण अंडी हा पोषणाचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. अंड्यामध्ये...
दापोलीत व्हेल माशाची उलटी जप्त; एका पोलीस कर्मचाऱ्यासह 4 आरोपींना अटक
दिल्लीत JNU विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांसोबत धक्काबुक्की; 28 विद्यार्थी ताब्यात
Mumbai News – बनावट सोन्याची बिस्किटे देऊन दागिने घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी देता येणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांना चिकन मसाला वाटप, भाविकांमधून तीव्र नाराजी; मंदिर समितीकडून बिव्हिजी कंपनीला नोटीस
Pune News – धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान