छत्तीसगडमध्ये 103 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 80 पुरुष आणि 23 महिलांचा समावेश
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलविरोधी कारवाईला मोठे यश मिळाले आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांची अथक कारवाई आणि परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन 103 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 80 पुरुष आणि 23 महिलांचा समावेश आहे. यामध्ये 49 नक्षलवाद्यांचा समावेश आहे, ज्यांच्यावर 1 कोटी 6 लाख 30 हजार रुपयांचे बक्षीस आहे.
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये दंडकारण्य स्पेशल जनता सरकारचे अध्यक्ष, पीपल्स काँग्रेसचे सदस्य, एसीएम, डीव्हीसीएम, जनता सरकारचे सदस्य, मिलिशिया प्लाटून सदस्य आणि सीएनएम, केएएमएस आणि डीएकेएमएस सारख्या आघाडीच्या संघटनांचे सदस्य यांचा समावेश आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांना सरकारी धोरणानुसार प्रत्येकी 50-50 हजार रुपयांचे प्रोत्साहन रक्कम देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये अनेक वरिष्ठ पदाधिकारी होते, ज्यांच्यावर मोठे इनाम जाहीर करण्यात आले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List