शारदीय नवरात्र महोत्सव 2025 – तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

शारदीय नवरात्र महोत्सव 2025 – तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणात, कूंकवाच्या मुक्त उधळणीत आणि “आई राजा उदो-उदो”च्या जयघोषात तुळजाभवानी देवींचा हा सोहळा पारंपरिक रीतिरिवाजांनुसार साजरा करण्यात आला.

पहाटे श्री तुळजाभवानी देवीची १०८ साड्यांमध्ये गुंडाळून भिंगार (अहिल्यानगर) येथून आलेल्या मानाच्या पालखीतून मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण करत मिरवणूक काढण्यात आली. प्रदक्षिणेच्या दरम्यान देवीची पालखी पिंपळाच्या पारावर टेकवून आरती करण्यात आली.

विजयादशमीच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवी आपले सिंहासन सोडून भाविकांसोबत सीमोल्लंघन करण्यासाठी मंदिराबाहेर येते, अशी परंपरा आहे. सीमोल्लंघन पूर्ण झाल्यानंतर देवी पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी संपूर्ण परिसरात कुंकवाची मुक्त उधळण करण्यात आली. भाविकांच्या “आई राजा उदो-उदो” च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला.

मंदिरातील या धार्मिक सोहळ्यास आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, सौमय्याश्री पुजार, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

दरवर्षी शारदीय नवरात्रात होणाऱ्या या पारंपरिक सीमोल्लंघन सोहळ्याची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. आजही पहाटेपासूनच हजारो भाविक मंदिर परिसरात जमले होते. कुंकवाची उधळण, देवीच्या जयघोषांनी तुळजापूर नगरी मंगलमय वातावरणात न्हाऊन निघाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अपराजिताच्या फूलाचे आरोग्यदायी रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल…! अपराजिताच्या फूलाचे आरोग्यदायी रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल…!
आपल्या आरोग्यास आकार देण्यात आहार सर्वात महत्वाची भूमिका बजावतो. म्हणूनच, आपण आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे महत्वाचे आहे जे...
ICMR चा अहवाल,भारतीय जेवण रुचकर परंतू आरोग्यासाठी हानिकारक
स्कूल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग, चिपळूणमध्ये संतापाची लाट
ज्ञानेश कुमार तोंड लपवून का बसले आहेत? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
Ranji Trophy 2025-26 – मुंबईविरुद्ध 40 वर्षीय खेळाडूने ठोकलं ऐतिहासिक शतक
कर्नाटकातील शाळा आणि कॉलेजमध्ये संघाच्या कार्यक्रमांवरील बंदी, राज्य सरकारचा निर्णय
पुणे बाजार समितीने पणन मंत्र्यांना दाखवला कात्रजचा घाट, मंत्र्यांचे आदेश झुगारून बाजारात पुन्हा टपरी थाटली