कौटुंबिक न्यायालयातील मीटर रुममध्ये आग; वद्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
वसमत रस्त्यावरील राजगोपालाचारी उद्यानाजवळ असलेल्या कौटुंबिक न्यायालयातील मीटर रूममध्ये आज शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक स्फोट होऊन आग लागली. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या दुर्घटनेची माहिती मिळताच काही विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान दाखवत न्यायाधीशांसह न्यायालयातील सर्व कर्मचारी वर्गाला सुखरूप बाहेर काढले. विजेचा प्रवाह तत्काळ खंडित करून मोठ्या दुर्घटनेला अटकाव करण्यात आला. तसेच आग पसरू नये यासाठी फायर बॉलच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून विद्युत बिघाडामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List