पुणे बाजार समिती संचालक मंडळाचा अजित पवारांना दणका; कात्रज दूध संघाच्या आउटलेटसाठी जागेला नकार, पण अनधिकृत टपरी केली अधिकृत
पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काही संचालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांची संस्था असलेल्या कात्रज डेअरीच्या आऊटलेटसाठी जागा देण्याचा ठराव नामंजूर केला. मात्र, याच बैठकीत अनधिकृत टपरी अधिकृत करण्याचा ठराव मंजूर केला. बाजारात टपऱ्यांमधून तंबाखू, पानमसाला, गुटखा विक्रीला परवानगी असून दुधाच्या पदार्थांना विक्रीस परवानगी नाकारली आहे. त्यामुळे अडचण आली की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणाऱ्या संचालक मंडळाने अजित पवार यांनाच दणका दिल्याची चर्चा आहे.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) अध्यक्ष ॲड .स्वप्नील ढमढेरे यांनी कात्रज मिल्क व प्रॉडक्ट फॅक्टरी आऊटलेटसाठी जागा मिळणेबाबत बाजार समितीकडे पाठपुरावा करत आहेत. बाजारात दूध दही ताक लस्सी श्रीखंड आदी दुधाचे पदार्थ बाजारातील हमाल, कामगार, आडते, वाहनचालक यांनाही आस्वाद घेता यावा या दृष्टीने पुणे जिल्हा दूध संघाने ही मागणी केली होती. यामुळे संघासह पर्यायाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय आल्यानंतर कात्रज दूध संघ ही संस्था शेतकऱ्यांची आहे. संस्थेचे नेतृत्व उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहेत. यती यातून शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याने सुरक्षा विभागामार्फत जागेची पाहणी करून अहवाल सादर करून जागा देण्याचा ठराव मंजूर करण्याची मागणी संचालक व माजी सभापती दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर, राजाराम कांचन यांनी केली. मात्र, संचालक मंडळातील इतर सदस्यांनी या ठरावाला विरोध करत तो नामंजूर केला. नोंदविलेने सदरचा ठराव ४ विरूद्ध १४ ने नामंजूर करणेत आला. मात्र, याच बैठकीत संतोष राजू देवेंद्र यांच्या अनधिकृत टपरीला अधिकृत करण्याचा ठराव मंजूर केला आहे.
अजित पवार गटाच्या संचालकांचाही विरोध
बाजार समितीच्या विविध सरकारी खात्यातील प्रलंबित प्रश्नांसह कारखान्याची जमीन खरेदी अथवा राष्ट्रीय बाजाराची टांगती तलवार अशा अडचणींच्या वेळी संचालक मंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्रयाला जाते. मात्र, अजित पवार यांच्या संस्थेचा विषय आल्यानंतर सभापती आणि उपसभापती यांच्यासह अजित पवार गटाचे संचालक गणेश घुले, संतोष नांगरे, मनिषा हरपळे यांनी देखील या ठरावाला विरोध केला आहे. यामुळे संचालक मंडळाची दुटप्पी भूमिका समोर आली आहे.
पुणे बाजार समिती आणि पुणे जिल्ह दूध उत्पादक संघ या दोन्ही संस्था शेतकऱ्यांच्या आहेत. वेळेवेळी मदतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन त्यांच्याच संस्थेला जागा नाकारणे शहाणपणाच लक्षण नाही. मात्र, याच मीटिंगमध्ये अनधिकृत टपरीला अधिकृत करून घेण्याचा ठराव मंजूर केला हे कृत्य बेकायदेशीर आहे. – प्रशांत काळभोर, संचालक, बाजार समिती, पुणे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List