Ratnagiri News – वाटद पंचक्रोशीत वातावरण तापले, एमआयडीसी विरोधातील बॅनर फाडला

Ratnagiri News – वाटद पंचक्रोशीत वातावरण तापले, एमआयडीसी विरोधातील बॅनर फाडला

रत्नागिरीत गणेशोत्सवाच्या काळात वाटद एमआयडीसी विरोधात ग्रामस्थांनी वाटद कोलतेवाडी येथे लावलेल्या बॅनर अज्ञात व्यक्तीने 19 सप्टेंबरला मध्यरात्री फाडून टाकला आहे. वाटद एमआयडीसीला विरोध दर्शविणारा बॅनर फाडल्याने ग्रामस्थ संतापले असून वाटद पंचक्रोशीत वातावरण तापले आहे.

वाटद एमआयडीसीच्या विरोधातील आंदोलनाला धार चढल्यानंतर एमआयडीसी रेटणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांपाठोपाठ मुंबईतील चाकरमान्यांनी देखिल आंदोलनात पाऊल ठेवल्याने एमआयडीसीला असलेला विरोध वाढला आहे. एमआयडीसीसाठी वाटद पंचक्रोशीतील दोन हजार दोनशे एकर जमीन संपादित करण्याचा सरकारचा डाव असून एक हजार एकर जमीन रिलायन्स डिफेन्सला देण्यात येणार आहे.उर्वरित 1200 एकर जमिनीचे काय करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी या वाटद एमआयडीसीला विरोध केला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात वाटद पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घरादारावर वाटद एमआयडीसी विरोधाचे बॅनर लावले होते.” एकच जिद्द एमआयडीसी रद्द हे गणराया हे गावावर आलेले विनाशकारी संकट कायमस्वरूपी हद्दपार होऊ दे.” अशी प्रार्थना करण्यात आली होती. घरादारावर झळकलेल्या बॅनरमुळे वाटद एमआयडीसीला विरोध नाही म्हणाऱ्यांची बोलती बंद झाली होती. मात्र वाटद कोलतेवाडी येथे ग्रामस्थांनी लावलेला बॅनर अज्ञात इसमाने फाडून टाकला आहे.ग्रामस्थांनी या कृत्याचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे.बॅनर फाडला तरी एमआयडीसीला असलेला विरोध मोडून काढू शकत नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या बॅनरचे तुकडे केलेले नाही हे सर्वसामान्य जनतेच्या भावनेचे तुकडे केले आहेत. आमचा संघर्ष हा वैचारिक,संविधान्मक आहे त्यामुळे जर कुणाला वाटत असेल की अशा पद्धतीने बॅनर फाडून आम्ही फार मोठी क्रांती केली आहे.तर त्यांच्या माहिती करिता या अशा सामाजिक अशांतता प्रस्तापित करणाऱ्या बांडगुळांचा शोध चालू आहे येत्या काही दिवसात हीच सर्वसामान्य जनता त्यांच्या न्याय हक्कासाठी यांचे कपडे फाडल्या शिवाय राहणार नाही.
प्रथमेश गवाणकर, वाटद एमआयडीसी संघर्ष समिती प्रमुख

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

H-1B व्हिसा शुल्काबाबत मोठी अपडेट; फक्त नवीन अर्जदारांना लागू, विद्यमान व्हिसाधारकांवर नाही होणार परिणाम H-1B व्हिसा शुल्काबाबत मोठी अपडेट; फक्त नवीन अर्जदारांना लागू, विद्यमान व्हिसाधारकांवर नाही होणार परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या H-1B व्हिजा शुल्क वाढीच्या निर्णयाने मोठा गोंधळ उडाला आहे. ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिजा शुल्क १...
ST मध्ये मेगा भरती, 17450 चालक, सहाय्यकांची पदे भरणार; जाणून घ्या किती असेल पगार
कौटुंबिक न्यायालयातील मीटर रुममध्ये आग; वद्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
Photo – पुण्यातील रायरेश्वर पठार मनमोहक फुलांनी बहरलं
OBC Reservation – सरकार मधील मंत्री बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव टाकत आहे, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
मिरजोळे एमआयडीसीतील वेश्याव्यवसाय प्रकरणी प्लॉटमालकाला अटक
Latur News – बॅंकेसमोरून भरदिवसा 30 लाखांची रोकड पळवली, कारची काच फोडून अज्ञात पैसे घेऊन पसार