Jammu Kashmir – उधमपूरच्या जंगलात जोरदार धुमश्चक्री; जैशचे 3-4 दहशतवादी सापळ्यात अडकले, चकमकीत 1 जवान शहीद

Jammu Kashmir – उधमपूरच्या जंगलात जोरदार धुमश्चक्री; जैशचे 3-4 दहशतवादी सापळ्यात अडकले, चकमकीत 1 जवान शहीद

जम्मू-कश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला असून जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन ते चार दहशतवाद्यांची कोंडी केली आहे. उधमपूरमधील दुडू-बसंतवाड आणि दोडाच्या भदरवाहा येथील सोजधरच्या जंगलामध्ये ही कारवाई सुरू आहे.

व्हाईट नाईट कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, दोडा-उधमपूर सीमेवरील जंगलामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. लष्कर,  विशेष ऑपरेशन्स ग्रुप आणि पोलिसांद्वारे शोध मोहीम सुरू असताना जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये एक जवान जखमी झाला होता, मात्र शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरुच

– दुडू-बसंतगडच्या जंगलात 26 जूनला झालेल्या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख कमांडर हैदर याचा खात्मा करण्यात आला होता. चार वर्षांपासून तो या भागामध्ये सक्रिय होता.

– बसंतगड परिसरात 25 एप्रिल रोजी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला होता.

– जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जम्मू-कश्मीर पोलीस आणि लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाई दरम्यान एके-47 रायफलसह 4 एके मॅगझिन, 20 हँडग्रेनेड, डिजिटल उपकरणे आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली.

कश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान शहीद

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

H-1B व्हिसा शुल्काबाबत मोठी अपडेट; फक्त नवीन अर्जदारांना लागू, विद्यमान व्हिसाधारकांवर नाही होणार परिणाम H-1B व्हिसा शुल्काबाबत मोठी अपडेट; फक्त नवीन अर्जदारांना लागू, विद्यमान व्हिसाधारकांवर नाही होणार परिणाम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या H-1B व्हिजा शुल्क वाढीच्या निर्णयाने मोठा गोंधळ उडाला आहे. ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिजा शुल्क १...
ST मध्ये मेगा भरती, 17450 चालक, सहाय्यकांची पदे भरणार; जाणून घ्या किती असेल पगार
कौटुंबिक न्यायालयातील मीटर रुममध्ये आग; वद्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
Photo – पुण्यातील रायरेश्वर पठार मनमोहक फुलांनी बहरलं
OBC Reservation – सरकार मधील मंत्री बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव टाकत आहे, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
मिरजोळे एमआयडीसीतील वेश्याव्यवसाय प्रकरणी प्लॉटमालकाला अटक
Latur News – बॅंकेसमोरून भरदिवसा 30 लाखांची रोकड पळवली, कारची काच फोडून अज्ञात पैसे घेऊन पसार