छत्रपती ताराराणींच्या शौर्यगाथेने सातारकर मंत्रमुग्ध; ‘रणरागिणी ताराराणी’ महानाट्याचे सादरीकरण
सांस्कृतिक कार्य विभाग व सातारा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विशेष सहकार्याने आयोजित राज्य महोत्सवानिमित्त येथील शाहू कला मंदिरात ‘रणरागिणी ताराराणी’ या ऐतिहासिक महानाट्याचे भव्य सादरीकरण करण्यात आले. छत्रपती ताराराणी यांच्या शौर्यगाथेचे प्रभावी चित्रण पाहून रसिक भारावून गेले.
युवराज पाटीललिखित व विजय राणे दिग्दर्शित या महानाट्यात तब्बल 50 हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. ताराराणींच्या शौर्यगाथेचे प्रभावी चित्रण पाहून रसिक भारावून गेले. प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सादरीकरणाला दाद दिली. तसेच याचसोबत स्थानिक कलाकारांनी सादर केलेले ‘भक्ती रेपोस्ट’ हा संगीतमय कार्यक्रमही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, तहसीलदार समीर यादव, पंकज चव्हाण यांच्यासह सातारा शहरातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List