उद्धव ठाकरे सरकारची शिवभोजन थाळी योजना सुरू राहणार, 200 कोटींचा निधी मंजूर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने सुरू केलेली शिवभोजन थाळी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्या शिवभोजन थाळीसाठी 200 कोटींच्या निधीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सध्या शिवभोजनाची अनेक केंद्र अनुदानाअभावी बंद पडली आहेत. त्यांना आता लगेच अनुदान देऊन ही केंद्र पूर्ववत करण्यात येतील असे देखील बावनकुळे यांनी सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे हे चंद्रपूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी ही माहिती दिली.
बावनकुळेंनी जनसंवाद केलाच नाही, आपचा आरोप
बावनकुळे यांच्या चंद्रपूर दौऱ्यात जनसंवाद उपक्रमाचा समावेश होता. यामाध्यमातून ते लोकांशी संवाद साधणार होते. मात्र, त्यांनी केवळ देखावा केला असून, निवेदने स्वीकारून लोकांची बोळवण केली, असा आरोप आम आदमी पार्टीने केला. सर्वसामान्य नागरिक आणि आपचे पदाधिकारीही या जनसंवाद कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. अनेकांना आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडायच्या होत्या. मात्र बावनकुळे यांनी एकही व्यक्तीची समस्या ऐकली नाही. केवळ लेखी निवेदने स्वीकारली आणि आलेल्या लोकांची दिशाभूल केली, असा आरोप आपचे जिल्हा संयोजक मयूर राईकवार यांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List