71 व्या वर्षी आकाशाला गवसणी, केरळच्या लीला जोस यांचे 13 हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता. त्यात वयाचे अडसर येत नाही. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे केरळच्या लीला जोस. त्यांनी वयाची भीड न बाळगता 71 व्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी केली. केरळच्या इडुक्की जिह्यातील कोन्नाथडी येथील रहिवाशी लीला जोस 13 हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करणाऱ्या राज्यातील सर्वात वृद्ध महिला ठरल्या आहेत.
लीला यांनी स्कायडायव्हिंगचे स्वप्न पाहिले होते. आकाशात उडणारी विमाने पाहून त्यांना अनेकदा आकाशात झेपावण्याची इच्छा होत होती. एकदा उडणारे विमान पाहून त्यांनी मित्रांना सहज म्हटले होते, स्कायडायव्हिंग करायला किती मजा येईल! त्या वेळी सगळ्यांनी त्यांची थट्टा केली. मात्र लीला यांनी त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मुलाने म्हणजे अनिशने दुबईच्या स्कायडायव्हिंग टीमसोबत टँडम जंप बुक केला आणि अनिश 71 वर्षांच्या आईला घेऊन तेथे पोहोचला. लीला यांनी अनुभवलेला तो क्षण सुवर्णक्षणांपैकी एक होता. ‘‘एका क्षणी मला फार हलके वाटले. त्या वेळी मी सगळे विचार विसरून त्या क्षणाचा आनंद घेतला,’’ असे लीला यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List