म्हाडाच्या 5,285 घरांच्या सोडतीला मुदतवाढ; 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार, 9 ऑक्टोबरला संगणकीय सोडत

म्हाडाच्या 5,285 घरांच्या सोडतीला मुदतवाढ; 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार, 9 ऑक्टोबरला संगणकीय सोडत

म्हाडाच्या कोकण मंडळाने 5,285 घरांच्या आणि सिंधुदुर्गातील ओरोस व कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंडांच्या विक्रीकरिता आयोजित सोडतीला दुसऱयांदा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार इच्छुकांना आता 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार असून 9 ऑक्टोबरला ठाण्यात सोडत काढण्यात येईल.

कोकण मंडळाच्या या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 565 घरे, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 घरे, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेली 1677 घरे आणि म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 41 घरे तसेच 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

रेकॉर्डब्रेक अर्ज

कोकण मंडळाच्या यंदाच्या सोडतीला रेकॉर्डब्रेक म्हणजेच मुंबईतील घरांच्या तोडीचे अर्ज आले आहेत. या सोडतीसाठी गुरुवारी 6.30 वाजेपर्यंत 1,52,205 अर्ज आले असून 1,19,038 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. मुदतवाढ दिल्यामुळे अर्जदारांच्या संख्येत मोठी वाढ होईल.

नवीन वेळापत्रकानुसार, या सोडतीसाठी 12 सप्टेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज तर 13 सप्टेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करता येणार आहे. सोडतीसाठी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्जदारांनी अर्ज करावा, असे आवाहन कोकण मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;