हिंदुस्थानी तरुणाला मेटाकडून मिळाले 845 कोटींचे पॅकेज
आयआयटी कानपूर ते मेटा अशी झेप घेणाऱ्या त्रपित बन्सलचा प्रवास केवळ करियरचा एक टप्पा नाही, तर ती अनेकांसाठी प्रेरणादायी अशी यशोगाथा बनली आहे. त्रपित बन्सल यांचा 845 कोटीच्या पगाराची आज जगभरात चर्चा आहे. त्याच्या पगाराचे आकडे ऐकून सारेच चक्रावून गेले आहेत. मेटाच्या सुपरइंटेलिजन्स लॅबमध्ये त्याने अविश्वसनीय असे पॅकेज घेऊन दणदणीत एंट्री घेतली आहे. त्रापित बंसल हा मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याने महाविद्यालयीन शिक्षण उत्तर प्रदेशमधूनच पूर्ण केले. त्यानंतर त्याने पुढील शिक्षणासाठी आयआयटी कानपूर गाठले. कानपूर येथून ‘मॅथमॅटीक्स अँड स्टॅटिस्टीक्स’ विषयात त्याने त्याचे बीएससीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने पुढे अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मेटामध्ये काम करण्याआधी ओपनएआय, फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, आयआयएससी बंगळुरु येथे इंटर्नशीपदेखील केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List