मी अजून 30 ते 40 वर्षे जगू शकतो; उत्तराधिकाऱ्यांच्या चर्चांना दलाई लामांकडून पूर्णविराम
दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्यांची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच आमच्या परवानगीशिवाय नवीन लामा निवडला जाऊ शकत नाही. नवीन लामांच्या निवडीसाठी आमची परवानगी गरजेची आहे, असे चीनने म्हटले आहे. त्यामुळे याबाबतची चर्चा होत आहे. आता उत्तराधिकाऱ्यांच्या चर्चांना दलाई लामा यांनीच पूर्णविराम दिला आहे. दलाई लामा यांचा 6 जुलै रोजी वाढदिवस आहे. ते आता नव्वदी गाठणार असल्याने त्यांचा वारसदार कोण अशी चर्चा होत आहे. तसेय या वाढदिवसाला ते आपला उत्तराधिकारी जाहीर करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता दलाई लामा यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दलाई लामा आता त्यांचा उत्ताराधिकारी जाहीर करणार का, याबाबत ते म्हणाले की, अजून मी 30 ते 40 वर्षे जगू शकतो आणि मानवतेसाठी काम करु शकतो असे म्हटले आहे. त्यामुळे दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण,या बाबतचे गुढ आणखी वाढले आहे. दलाई लामा निवडण्याची प्रक्रिया किचकट, अवघड असून त्यासाठी विशिषअट आध्यात्मिक संकेत समजणे गरजेचे असते. त्यामुळे याबाबत नेहमी चर्चा होत असतात. याकायम आहे.
अजून मला जगायचं आहे आणि मी 30 ते 40 वर्षे मी जगू शकतो, असे म्हणत 15 व्या लामाबद्दल सस्पेन्स कायम ठेवला आहे. दलाई लामा यांनी शनिवारी मॅकडलोडगंज येथील मुख्य तिबेटी मंदिर त्सुगलागखांग येथे आयोजित एका दीर्घायु प्रार्थना कार्याक्रमा दरम्यान हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमात उपस्थित अनुयायी आणि बौद्ध भिक्खूंना संबोधित करताना दलाई लामा म्हणाले की मला स्पष्टपणे संकेत मिळाले आहे की जे हे दर्शवत आहेत की अवलोकितेश्वर ( तिबेटी बौद्ध परंपरेतील करुणेचे प्रतीक असलेली देवता ) यांची कृपा माझ्यावर आहे. ते म्हणाले की अनेक भविष्यवाणी आणि आध्यात्मिक अनुभूतींना ध्यानात घेता,मला हे जाणवत आहे की मला ईश्वरीय मार्गदर्शन मिळत आहे. मी संपूर्ण निष्ठेने कार्य केले आहे आणि भविष्यातही करीत राहणार आहे.
दलाई लामा यांनी यावेळी त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दल कोणतीही औपचारिक घोषणा केली नसली तरी, त्यांनी हे स्पष्ट केले की सध्या त्यांचे लक्ष उत्तराधिकारी निवडण्यावर नाही, तर त्यांच्या आयुष्यातील उर्वरित काळ सेवा आणि साधनासाठी समर्पित करण्यावर आहे. यामुळे आता उत्तराधिकाऱ्याच्या विषयाला दलाई लामा यांनीच आता पूर्णविराम दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List