अमित शहा राजीनामा द्या; शिवसैनिक आक्रमक; पहलगाम हल्ल्याचा जोरदार निषेध

अमित शहा राजीनामा द्या; शिवसैनिक आक्रमक; पहलगाम हल्ल्याचा जोरदार निषेध

जम्मू कश्मीर, पहलगाम या ठिकाणी भारतीय तसेच काही परदेशी पर्यटकांवर दहशतवाद्यांकन हल्याचा निषे करून, गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्या, अशी जोरदार मागणी शहर शिवसेना (उद्भव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे झालेल्या निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

देशात पठाणकोट, उरी, पुलवामा, काल पहलगाम, वानंतरही कुणाला जर वाटत असेल की आपला देश सुरक्षित हातात आहे, तर तो मोठा भ्रम आहे, हे आता समोर आले आहे. हिंदुस्थानातील नागरिक हिंदुस्थानातच सुरक्षित नसतील आणि चांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना इथे येऊन सुरक्षित राहणार असतील, तर अशा असक्षम मोदी सरकारने तत्पर राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी घोषणा देताना देशाचे गृहमंत्री अमित शहा राजीनामा द्या, ही आंदोलनात मागणी केली आणि निषेध नोंदवला.

आंदोलनास शहरप्रमुख संजय मोरे, गजानन बरकुडे, रामभाऊ पारिख, संघटक राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, मकरंद पेठकर, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, प्रसिद्धिप्रमुख अनंत घरत, विभागप्रमुख अतुल दिघे, सूरज लोखंडे, चंदन साळुंके, अनिल माझिरे, जयदीप पडवळ, दिलीप पोमण, संतोष भुतकर, महिला आघाडीच्या निकिता मारटकर, विद्या होडे, अमृत पठारे, रोहिणी कोल्हाळ, वैशाली दारवटकर, पद्मा सोरटे, ज्योती चांदरे, सलमा भाटकर, करुणा घाडगे, स्नेहल पाटोळे, विजया मोहिते, सोनाली जुनावणे, मृणमयी लिमये, रोहिणी मडोले, युवा सेनेचे युवराज पारिख, परेश खांडके, गणेश काकडे, सोहम जाधव, नीरज नांगरे, सोनू पाटील, गणेश घोलप, अंकित अहिरे, अक्षय हबीब, चिंतामण मुंगी, प्रसाद जठार, रोहित नलावडे, हेमंत धनवे, रमेश क्षीरसागर, सतीश गिरमे, मकरंद कळमकर, विजय रावडे, अनंत हुलवले, योगेश तापकीर, नितीन मोरे, मारुती वावें, संतोष तोंडे, नीलेश वाघमारे, सनी गायकवाड, बकुळ धाकावे, रमेश परदेशी, इम्रान खान, हेमंत यादव, प्रकाश चवरे, सचिन घोलप, हरिभाऊ सपकाळ, संजय साळवी, आनंद केंद्रे, सूरज खंडागळे, प्रफुल्ल शिंदे, निरंजन कुळकर्णी, प्रवीण रणदिवे, गिरीश गायकवाड, सचिन मोहिते, राहुल शेडगे, पंकज परदेशी, अमित वावर, संतोष होडे, प्रकाश कांबळे आणि नागरिक उपस्थित होते.

अफवांवर विश्वास ठेवू नये; पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच काही संशयास्पद गोष्टी, अनुचित घटना घडल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी (क्रमांक ११२) संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले कौस्तुभ गनवोटे, संतोष जगदाळे यांचे पार्थिव सायंकाळी विमानाने पुण्यात आणण्यात येणार आहे. गनबोटे कोंढव्यातील साईनगर परिसरात वास्तव्यास होते. जगदाळे कर्वेनगर भागात वास्तव्यास होते. कर्वेनगर, कोंढवा परिसरातील बंदोबस्तात वाढ केली आहे.

दृष्टिकोनातून पुण्यातही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी रात्रीपासून शहरातील संवेदनशील भागांतील बंदोबस्तात वाढ केली आहे. ठिकाणी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी शहरातील फौजफाटा घडामोडींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या संदेशांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, सोशल मीडियाद्वारे अफवा प्रसारित केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सचिनच्या लेकीला वाटते ‘या’ गोष्टीची सर्वात जास्त भीती; साराचं उत्तर जाणून आश्चर्य वाटेल सचिनच्या लेकीला वाटते ‘या’ गोष्टीची सर्वात जास्त भीती; साराचं उत्तर जाणून आश्चर्य वाटेल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर तिचे व्हॅकेशन आणि कामाशी संबंधित अपडेट्स शेअर...
अंगाला लागलेल्या हळदीसह नवरदेव जवान सीमेवर हजर, नवरी म्हणाली ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझे कुंकू पाठवतेय
Operation Sindoor- लढाऊ गणवेशात अवतरल्या हिंदुस्थानच्या रणरागिणी!
रत्नागिरी – पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला चोपले
Operation Sindoor- जय हिंद! हिंदुस्थानी सैन्याची ही आहे बलाढ्य शक्ती, पाकिस्तानला आता पळता भुई थोडी
Operation Sindoor – आमच्या सहनशिलतेचा कोणीही गैरफायदा घेऊ नये, अन्यथा सणसणीत प्रत्युत्तर मिळेल; राजनाथ सिंहांचा पाकला खणखणीत इशारा
Operation Sindoor ‘आम्ही गुन्हेगार आहोत, अल्लाह आमची हिफाजत कर’ पाकिस्तानी खासदार संसदेत ढसाढसा रडला