Match Fixing IPL 2025 – राजस्थान रॉयल्सची मॅच फिक्सिंग! लखनऊ विरुद्धचा सामना वादाच्या भोवऱ्यात
IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात शनिवारी (19 एप्रिल 2025) झालेला सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सामन्यात राजस्थानचा पराभव झाला होता. हातात 6 विकेट बाकी असताना शेवटच्या षटकात राजस्थानला 9 धावा करण्यात अपयश आले आणि लखनऊचा अवघ्या 2 धावांनी विजय झाला. या पराभवामुळे राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या (RCA) जयदीप बिहाणी यांनी या सामन्यात काहीतरी गडबड झाल्याचं म्हटलं आहे.
जयदीप बिहाणी यांनी या सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली आहे. शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती, हातात विकेट होत्या आणि घरच्या मैदानावर खेळत असताना संघ पराभूत झाला. एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, घरच्या मैदानावर संघ कसा काय पराभूत झाला. संघाची पार्श्वभूमी थोडी वादग्रस्त राहिली आहे. 2013 साली झालेल्या मॅच फिक्सींगवरुन ते म्हणाले की, तेव्हाही राजस्थानचे काही खेळाडू फिक्सींगमध्ये सामील होते. संघ मालक राज कुंद्रा यांच्यावर सुद्धा यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे संघावर दोन वर्ष निर्बंध लावण्यात आला होता. त्यामुळे यावेळी सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी BCCI कडे केली आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
अनहोनीला होनी करणार का धोनी? आठपैकी सहा पराभवांमुळे चेन्नईवर साखळीतच बाद होण्याचे संकट
आयपीएलमध्ये राजस्थानचा खेळ अगदीच सुमार राहिला आहे. लखनऊविरुद्धच नाही तर, दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यातही राजस्थानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला होता. राजस्थानने आत्तापर्यंत झालेल्या 8 सामन्यांपैकी फक्त 2 सामने जिंकले असून गुणतालिकेत त्यांचा क्रमांक आठवा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List