उन्हाळ्यात डोक्यामध्ये सतत खाज येत असेल तर ‘या’ हिरव्या पानांचा करा वापर, लगेच आराम मिळेल
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे आपल्याला खूप घाम येत असतो. त्यात घामामुळे डोक्यातील स्कॅल्पला खाज येण्याची समस्या अनेकदा उद्भवते. कधीकधी ही खाज इतकी वाढते की ती बरी करण्यासाठी तुम्हाला अनेक घरगुती उपाय करावे लागतात. घाम, धूळ आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे स्कॅल्प आणि केसांचे आरोग्य कमकुवत होऊ लागते. कधीकधी डोक्यातील घामामुळे स्कॅल्पवर मुरुमे येतात किंवा इतर कारणांमुळे सतत खाज सुटण्याची समस्या कायम राहते. याकरिता पुरळ किंवा खाज दूर करण्यासाठी तुम्ही कॅमिकल प्रॉडक्टच्या वापर करण्याऐवजी नैसर्गिक पद्धतींचा देखील वापर करा.
भारतात अनेक आयुर्वेदिक पद्धती आहेत ज्यांचा अवलंब करून अनेक समस्येपासून आराम मिळू शकतो. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला डोक्यामधील खाज दुर करण्यासाठी कोणत्या हिरव्या पानांचा वापर करता येईल हे सविस्तरपणे आजच्या लेखात जाणून घेऊयात…
ग्रीन टीची पाने
उन्हाळ्यात जर तुमचे डोक्यातील स्कॅल्पला खूप खाजत असेल तर तुम्ही ग्रीन टीचा वापर करू शकता. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. तुम्ही ग्रीन टीची पाने पाण्यात उकळू शकता, थंड करू शकता आणि नंतर ते तुमच्या केसांना लावू शकता. यामुळे तुमच्या डोक्यातील स्कॅल्पची खाजेपासून सुटका तर होईलच पण स्कॅल्पमधील संसर्गही बरा होईल.
कोरफडीची पाने
कोरफडीचं पान चवीला खूप कडू असतात पण ती तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतात. उन्हाळ्यात घामामुळे तुमच्या डोक्यातील स्कॅल्पला खूप खाज येते आणि संसर्ग होतो, म्हणून तुम्ही त्यावर कोरफडीच्या पानांमधील गर वापरू शकता. ते तुमच्या डोक्यातील स्कॅल्पला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. त्यामुळे खाजेपासून सुटका मिळते.
अक्रोडाची पाने
जर तुमच्या डोक्यातील स्कॅल्पला खुप खाज येत असेल तर तुम्ही अक्रोडाची पानाची पेस्ट बनवून वापरू शकता. यामुळे स्कॅल्पची जळजळ, खाज सुटणे आणि स्कॅल्प संसर्ग दूर करते.
पुदिन्याची पाने
डोक्यातील स्कॅल्पला खाज सुटल्यास तुम्ही तुमच्या स्कॅल्पवर पुदिन्याची पानांची पेस्ट देखील लावू शकता. यासाठी सर्वप्रथम पुदिन्याची पाने पातळ करून घ्या आणि नंतर स्कॅल्पला जिथे खाज येत असेल तिथे लावा.
कडुलिंबाची पाने
उन्हाळ्यात घामामुळे अनेकदा स्कॅल्पशी संबंधित समस्या उद्भवतात. खाज सुटणे, जखमा, मुरुम इत्यादी समस्या उद्भवू लागतात. जर तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही कडुलिंबाची पाने बारीक करून पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट लावू शकता. कडुलिंबाची पाने बुरशीनाशक असतात. त्यामुळे स्कॅल्पवरील संसर्ग दुर करता येतो.
गुलाबाची पाने
उन्हाळ्यात, जास्त घाम येणे आणि योग्य स्वच्छतेच्या अभावामुळे, बाळाच्या स्कॅल्पवर बॅक्टेरिया वाढू लागतात. यामुळे स्कॅल्पवर मुरुमे दिसू लागतात. तुम्ही गुलाबाच्या पानांचा वापर गुलाबाच्या पाण्यासोबत करू शकता. तुम्ही ते स्प्रे बाटलीत टाकून देखील वापरू शकता. गुलाबपाणी आणि त्याच्या पानांमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. यामुळे संसर्ग लवकर बरा होतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List