रस प्यायला ये म्हणलं माय… चेंगळ्या अन् मोगराला नेटीझन्सनी घेतलं डोक्यावर

रस प्यायला ये म्हणलं माय… चेंगळ्या अन् मोगराला नेटीझन्सनी घेतलं डोक्यावर

>> नवनाथ शिंदे

सोशल मीडियावर कोण कधी ट्रेंडिंगमध्ये येईल हे सांगता येत नाही. अशाच दोनजणांनी संपूर्ण मार्केट ‘जाम’ केले आहे. आपल्या ‘गावरान’ भाषेत त्यांनी नेटीझन्सची मने आकर्षित करून घेतली आहेत. ‘चेंगळ्या बोले कुहू’ अन् ‘रस प्यायला ये म्हटलं माय…’ या वाक्यांनी इन्स्टाग्राम, फेसबुक, थ्रेडवर राडा घातला आहे. चेंगळ्या आणि मोगराला नेटीझन्सनी डोक्यावर घेतलं असून, आता संबंधित यूट्यूबर्सची हवा डीजेवरही झाली आहे. त्यांनी बोललेल्या वाक्यावर गाणं तयार झालं असून, विविध कार्यक्रमांत ते वाजवलंही जात आहे.

इन्स्टाग्रामवर संबंधित मुलगा ‘चेंगळ्या 2008’ ही आयडी असून, त्याला तब्बल एक लाख 86 हजार फॉलोअर्स आहेत. सुरुवातीला काही व्हिडीओ करत असताना त्याने ‘चेंगळ्या बोले कुहू…’ असं म्हणत व्हिडीओ पोस्ट केला होता. संबंधित पोस्टला नेटीझन्सनी डोक्यावर घेतलं. अवघ्या काही दिवसांत त्याला लाखो लोकांनी पाहिल्यानंतर चेंगळ्याला फॉलो करण्यास सुरुवात केली. आता तो सुप्रसिद्ध यूट्यूबर झाला आहे. विविध हॉटेल्स दुकानांच्या उद्घाटन समारंभाला त्याला बोलावलं जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी डीजेवरसुद्धा ‘चेंगळ्या बोले कुहू…’ हे गाणं तयार करण्यात आलं आहे.

‘रस प्यायला ये म्हणलं माय…’ या वाक्याने तर संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक नेटकऱ्यांकडून एकमेकांना संबंधित आवाजातील हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. दरम्यान, प्रचंड ऊन लागत असल्यामुळे एका रसाच्या गाड्यावर भरलेला ग्लास हातात घेऊन ‘रस प्यायला ये म्हणलं माय…’ असं मोगाराने म्हटलं आहे. नेमकं तेच वाक्य पकडून नेटकऱ्यांनी मोगराला व्हायरल केलं आहे. सोशल मीडियासह तमाशा, नाट्य, छोट्या-मोठ्या कार्यक्रमांतही आवडीने हे शब्द डीजेवर वाजवले जात आहेत. अवघ्या काही महिन्यांत मोगराच्या फॉलोअर्समध्ये घसघशीत वाढ झाली आहे.

चेंगळ्याची स्टाइल अन् मोगराचा आवाज

डायलॉग पूर्ण झाल्यानंतर संबंधित तरुणाकडून ‘चेंगळ्या बोले कुहू…’ असं म्हणतानाच उजव्या हाताची दोन बोटं उचलून अॅक्शन केली जात आहे. त्यानुसार नेटकऱ्यांनी शेकडो कमेंट्स अन् लाइक्सचा पाऊस पाडून चेंगळ्याला फेमस केलं आहे. तर, मागील अनेक महिन्यांपासून ‘मोगरा… मोगरा…’ असं म्हणत संबंधित यूट्यूबरने व्हिडीओंचा धडाका सुरू केला होता. त्यातच रस पिण्याआधी त्याने ‘रस प्यायला ये म्हणलं माय…’ अशा घोगऱ्या आवाजातील डायलॉगला अनेकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे चेंगळ्याची स्टाइल अन् मोगराचा आवाज महाराष्ट्रात घुमत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनवणी राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनवणी
दहशतवाद काय असतो, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आणि सोसले आहे. त्यामुळे माझे राजकारण्यांना सांगणे आहे की, आमच्या भावनांशी खेळू...
एक रुपयात पीक विमा बंद; सुधारित योजना लागू करणार
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार? अनेक नावे चर्चेत, डार्क हॉर्स अधिकारी मारणार बाजी
वांद्रे येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये भीषण आग
मराठीसाठी शिवसेना आक्रमक; अरेरावी करणाऱ्या स्विगीला दाखला हिसका, मराठीद्वेष्ट्या व्हिवो कंपनीलाही इशारा
ज्येष्ठ अभिनेते-निर्माते प्रकाश भेंडे यांचे निधन
पहलगामचा बदला! लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य!! पंतप्रधान मोदी म्हणाले… टाईम, टार्गेट आणि अ‍ॅटॅक कसा करायचा हे तुम्हीच ठरवा!