आरोपीने कोर्टातच महिला न्यायाधीशाला धमकावले, विरोधात निकाल देताच… तू है क्या चीज… बाहर मिल…

आरोपीने कोर्टातच महिला न्यायाधीशाला धमकावले, विरोधात निकाल देताच… तू है क्या चीज… बाहर मिल…

दिल्ली कोर्टात चेक बाऊन्सप्रकरणी सुनावणी सुरू असताना महिला न्यायाधीशाने आरोपीच्या विरोधात निकाल देताच संतापलेल्या आरोपी आणि त्याच्या वकिलाने कोर्टातच महिला न्यायाधीशाला धमकावले. ‘‘तू है क्या चीज…तू बाहर मिल… देखते पैसे जिंदा घर जाती है,’’ असे म्हणत न्यायाधीशांना धमकी दिली. ही घटना 2 एप्रिल रोजी घडली. बार अँड बेंच वेबसाईटवरील माहितीनुसार, न्यायदंडाधिकारी शिवांगी मंगला यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि पुढील सुनावणीपर्यंत जामीनपत्र सादर करण्याचे निर्देश दिले. निकाल विरोधात लागल्याने संतप्त झालेल्या आरोपीने महिला न्यायाधीशावर वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीने वकिलाला सांगितले की, ‘‘मला माझ्या बाजूने निकाल हवाय. काय वाट्टेल ते कर आणि निकाल माझ्या बाजूने करून दे.’’ एवढ्यावर आरोपी थांबला नाही. त्याने ‘‘बाहेर भेट. तू कशी जिवंत घरी जातेस ते बघतो.’’ अशा शब्दांत धमकावले.

घटनेमुळे मानसिक, शारीरिक त्रास

या घटनेमुळे आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास झाल्याचे न्यायाधीश शिवांगी मंगला यांनी म्हटले. तसंच तू हे पद सोडून दे म्हणत त्यांना शिवीगाळ केली असे न्यायाधीश मंगला यांनी त्यांच्या आदेशात म्हटले. ‘तू आमच्या बाजूने निकाल दिला नाहीस तर तुझ्या विरोधात तक्रार दाखल करु, तू राजीनामा दे आणि या प्रकरणातून बाजूला हो’ अशीही धमकी दिली गेल्याचे त्यांनी म्हटले.

आरोपीच्या वकिलाला कारणे दाखवा नोटीस

धमकी दिल्याबद्दल आणि छळ केल्याबद्दल आरोपींवर राष्ट्रीय महिला आयोगासमोर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे न्यायाधीशांनी सांगितले. या प्रकरणात न्यायाधीशांनी आरोपीच्या वकिलालाही कारणेदाखवा नोटीस बजावली. अ‍ॅड. अतुल कुमार असे त्या वकीलाचे नाव आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कपूर खानदानातील अभिनेत्यासोबत इंटीमेट सीन देण्यासाठी अभिनेत्रीने…; 49 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा कपूर खानदानातील अभिनेत्यासोबत इंटीमेट सीन देण्यासाठी अभिनेत्रीने…; 49 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री अरुणा ईरानी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच 'द कपिल शर्मा शो'मध्ये आल्यानंतर त्यांनी...
सासरच्यांनी केला छळ, पतीचा हॉस्पिटलचे बिल भरण्यास नकार…; वयाच्या 45व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचा मृत्यू
दहशतवादाविरोधातल्या लढाईत आमचा हिंदुस्थानला पूर्ण पाठिंबा, अमेरिकन संसदेच्या अध्यक्षांची घोषणा
Mockdrill साठी सिव्हिल डिफेन्सचे दहा हजार स्वयंसेवक महाराष्ट्रात दाखल
VIDEO छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मॉकड्रीलचा सराव
Pahalgam Attack – अशी शिक्षा करा की, कोणीही हिंदुस्थानकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही – राहुल गांधी
मधुमेही रुग्णांसाठी ही फळे आहेत सर्वात उत्तम, वाचा सविस्तर