अभिनेत्रीच्या प्रायव्हेट मूमेंटचा व्हिडीओ व्हायरल; भडकून म्हणाली “कोणी हक्क दिला?”
‘छल: एक शह और मात’ आणि ‘थपकी प्यार की’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री हुनर हाली सध्या एका वेगळ्याच त्रासाचा सामना करतेय. यामागचं कारण म्हणजे पापाराझींनी तिचे काही व्हिडीओ शूट करून ते सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काही दिवसांपूर्वी हुनर एका ब्युटी सलॉनच्या कार्यक्रमात सेलिब्रिटी पाहुणी म्हणून पोहोचली होती. यावेळी तिच्या परवानगीशिवाय पापाराझींनी व्हिडीओ शूट करून ते व्हायरल केले. या व्हिडीओला काही जण ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचंही म्हणत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करणारी हुनर यावरून भडकली आहे.
‘टीव्ही 9 हिंदी डिजिटल’शी बोलताना हुनरने तिच्यासोबत घडलेल्या या घटनेची तीव्र निंदा केली. “मी त्या पापाराझींना माझे व्हिडीओ शूट करण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे मी त्यांना थेट प्रश्न विचारते की अशा पद्धतीने माझा व्हिडीओ शूट करून अपलोड करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? हे माझं शहर आहे. मी मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून राहतेय. हे कोणतं छोटं-मोठं शहर नाही. मी त्या कार्यक्रमाला हॉल्टर टॉप आणि ट्राऊजर परिधान करून गेली होती. त्यावरही पापाराझींनी लिहिलं की अन्कम्फर्टेबल क्लोथिंग (कपडे). मी रस्त्यावरून चालताना हॉल्टर टॉपला जोडून असलेलं पॅडिंग अचानक खाली घसरलं. मी तेच ठीक करण्याचा प्रयत्न करत होते. असं करताना त्याचा व्हिडीओ शूट करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? माझ्या नकळत त्यांनी हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. मुलींबद्दल कोणती गोष्ट पोस्ट केली पाहिजे आणि कोणती नाही हे तरी तुम्हाला समजायला हवं”, अशा शब्दांत तिने राग व्यक्त केला.
याविषयी ती पुढे म्हणाली, “मी अशा गोष्टींना खरंतर महत्त्व देत नाही. परंतु आज मी या संपूर्ण मुद्द्यावर बोलण्याचा निर्णय घेतला आहे. कारण ज्या इंडस्ट्रीत मी इतक्या वर्षांपासून काम करतेय, जे लोक मला खूप चांगल्या प्रकारे ओळखतात त्यापैकीच काही जण माझ्या या व्हिडीओवर कमेंट करत आहेत की हे पब्लिसिटी स्टंट आहे. मला धक्काच बसलाय. मी स्वत: अनेकांना मेसेज करून माझा तो व्हिडीओ हटवण्यास सांगितलं आहे. काहींनी माझं ऐकलंसुद्धा. परंतु काही जण फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी तो व्हिडीओ काढण्यास नकार देत आहेत. त्यामुळे माझ्यावर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा त्यांच्यावर करा.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List