कांताराचा धमाका! पहिल्याच दिवशी केली धमाकेदार ओपनिंग, कमाईचा केला रेकॉर्ड
रिषभ शेट्टीच्या कांतारा चाप्टर 1 या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या 24 तासात अनेक रेकॉर्ड तोडले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरात 60 कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाचे बजेट हे 125 कोटी असून सध्या या चित्रपटाचे विकेंडचे बहुतांश शो हाऊसफुल झाल्याने या आठवड्यातच हा चित्रपट त्याच्या बजेटच्या रकमेइतकी कमाई करेल असा अंदाज आहे.
कांतारा हा 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात पहिल्या दिवशी 60 कोटींचा गल्ला जमवला आहे. कांताराच्या आधी विकी कौशलच्या छावा हा चित्रपट 33 कोटींची कमाई करून तिसऱ्या स्थानावर होता.
या यादीत प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रजनीकांतचा ‘कुली’ 65 कोटी आणि पवन कल्याणचा ‘ओजी’ 63 कोटी अशी भरघोस कमाई करून पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List