इंडो थाईच्या कामगारांना भरघोस बोनस, भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश
भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील सर्वात मोठी हॅण्डलिंग कंपनी इंडो थाई एअरपोर्ट मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनीतील कामगारांना दिवाळीनिमित्त भरघोस बोनस मिळणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.
इंडो थाई एअरपोर्ट मॅनेजमेंट सर्व्हिस प्रा. लि. कंपनीच्या व्यवस्थापनासोबत भारतीय कामगार सेनेची बैठक पार पडली. या बैठकीत लोडर, ड्रायव्हर, क्लीनर या कामगारांसाठी 35 हजार रुपये आणि व्हाईट कॉलर कामगारांना एक बेसिक एवढी निश्चित झालेली दिवाळी बोनसची रक्कम देण्यात येणार असल्याचे ठरले. बोनस जाहीर झाल्यावर कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम, सुजित कारेकर आणि भारतीय कामगार सेनेचे आभार मानले.
या बैठकीला व्यवस्थापनाकडून सौरभ दळवी, ऋतूराज हिरेखान, आनंद राव, जुड गोंसाल्विज, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, सहचिटणीस सुजित कारेकर (युनिट अध्यक्ष), नीलेश ठाणगे, युनिट उपाध्यक्ष नरेंद्र दळवी, सरचिटणीस सुदर्शन वारसे, खजिनदार संतोष लखमदे, सदस्य हेमंत नाईक, नितीन कदम, हरिश्चंद्र कराळे, रवी शेलार, रमेश रसाळ, उमेश सुरती, अनिल गुरव आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List